महापालिकेत आता सदस्यांना ‘टॅब’
By Admin | Updated: February 26, 2015 00:09 IST2015-02-26T00:09:48+5:302015-02-26T00:09:48+5:30
महापालिकेचे कामकाज पेपरलेस आणि गतिमान होऊन सदस्यांना एका क्लिकवर जग कळावे, यासाठी आता लॅपटॉपऐवजी ‘टॅब’ देण्यााचा प्रस्ताव रिपाइंचे नगरसेवक प्रदीप दंदे यांचा आहे.

महापालिकेत आता सदस्यांना ‘टॅब’
अमरावती : महापालिकेचे कामकाज पेपरलेस आणि गतिमान होऊन सदस्यांना एका क्लिकवर जग कळावे, यासाठी आता लॅपटॉपऐवजी ‘टॅब’ देण्यााचा प्रस्ताव रिपाइंचे नगरसेवक प्रदीप दंदे यांचा आहे. अर्थसंकल्पानंतरच्या आमसभेत याअनुषंगाने प्रस्ताव सादर केला जाणार आहे.
महापालिकेच्या मागील सत्रात दंदे यांच्या प्रस्तावाच्या अनुषंगाने नगरसेवकांना लॅपटॉप देण्यात आले होते. चालू सत्रात ९२ पैकी ७६ सदस्यांनी लॅपटॉप घेतल्याची नोंद संगणकीय विभागात आहे. १६ सदस्यांनी लॅपटॉप घेतले नाही. परंतु ज्या उद्देशाने सदस्यांना लॅपटॉप देण्यात आले आहे, तो उद्देश पूर्ण होत आहे की, नाही हा संशोधनाचा विषय आहे. हल्ली महापालिकेत सदस्यांना वाटप करण्यात आलेले लॅपटॉप कालबाह्य झाले आहे. त्यामुळे नव्या रुपात, अद्ययावत माहिती असलेले ७ किंवा ८ इंचीचे ‘टॅब’ सदस्यांना देण्याबाबतचा प्रस्ताव पुढे आणला जात आहे. लॅपटॉपच्या तुलनेत टॅब हे स्वत: आणि हाताळणे सोयीचे असल्याने या प्रस्तावाला कुणाचा विरोध देखील राहणार नाही, असे प्रदीप दंदे म्हणाले. प्रशासनासोबत पत्रव्यवहार, शासन निर्णय, जगाची माहिती कळण्यासाठी टॅब अतीशय लाभदायक ठरेल, असे दंदे यांचे म्हणने आहे. सभेत हा प्रस्ताव आणण्यापूर्वी पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जाईल. सदस्यांकडे असलेले लॅपटॉप परत घेवून त्याचा लिलाव करुन येणाऱ्या रक्कमेत टॅब खरेदी करता येणार आहे. झपाट्याने बदलत चाललेल्या काळानुसार सदस्यांनाही कामकाजात गती आणणे आवश्यक आहे. त्याकरीताच हा प्रस्ताव पुढे आणला जात आहे. लॅपटॉपचे आयुष्य संपुष्टात आले आहे. (प्रतिनिधी)