आता सहायक वनसंरक्षकांना कार्यालयप्रमुखांचा दर्जा
By Admin | Updated: September 17, 2014 23:29 IST2014-09-17T23:29:31+5:302014-09-17T23:29:31+5:30
वनविभागात केवळ नाममात्र पद असलेल्या सहायक वनसंरक्षकांना आता ‘कार्यालय प्रमुख’ हा नवा दर्जा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना उपवनसंरक्षकाकडे फाईल

आता सहायक वनसंरक्षकांना कार्यालयप्रमुखांचा दर्जा
पापळ : वनविभागात केवळ नाममात्र पद असलेल्या सहायक वनसंरक्षकांना आता ‘कार्यालय प्रमुख’ हा नवा दर्जा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना उपवनसंरक्षकाकडे फाईल पाठविताना सहायक वनसंरक्षकांच्या मार्फतच पाठवावी लागेल. सहायक वनसंरक्षकांना अधिकार बहाल करण्यात आल्याने वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बराच अधिकारावर गंडांतर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने ३ सप्टेंबर २०१४ रोजी महसूल विभागाच्या धर्तीवर वनविभागात उपवनविभाग तसेच त्यांचे कार्यक्षेत्र व मुख्यालय निश्चित करण्याबाबत व सहायक वनसंरक्षकांना ‘कार्यालय प्रमुख’ म्हणून घोषित करण्याचा शासन निर्णय काढला.
या नव्या निर्णयामुळे नाममात्र असलेल्या सहायक वनसंरक्षकांना अधिकार बहाल करण्यात आले आहे.
वनविभागात कागदोपत्री अधिकारी पद म्हणजे सहायक वनसंरक्षक हे होते. मात्र आता वनांवर लक्ष ठेवण्यासह वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या कामाकाजावरही लक्ष ठेवण्याची जबाबदारी निश्चित केली आहे. वन विभागात प्रादेशिक विभाग स्तरावर तसेच वन्यजीव विभाग स्तरावर भारतीय वन सेवेचे, महाराष्ट्र वन सेवेचे अधिकारी उप वनसंरक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे अधिनस्त महाराष्ट्र वनसेवेचे सहायक वनसंरक्षक कार्यरत आहेत. सहाय्यक वनसंरक्ष हे वन विभागात वर्ग- १ चे उपविभागीय स्तरावरील अधिकारी आहेत. सहाय्यक वनसंरक्षकांना वन विभागात क्षुल्लक अधिकार असल्याने त्यांची काहीच चलती न्हवती. मात्र शासनच्या नव्या आदेशानुसार सहाय्यक वनसंरक्षकपद हे इतर विभागाशी समन्वय साधणे आणि उपवन संरक्षकांना तांत्रिक व धोरणात्मक कामकाजाकरिता वेळ मिळावा, यासाठी वन विभागात उपविभाग हा घटक निर्माण करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सहायक वनसंरक्षकांना अधिकार बहाल करताना शासनाने १४३ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना या पदावर बढतीसुद्धा दिली आहे. त्यामुळे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना बढतीसोबत अधिकारही मिळाल्याने वन अधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहावयास मिळत आहे. मागील काही वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या सहायक वनसंरक्षकांना शासनाच्या नव्याने दिलासा मिळाला.