-आता अतिक्रमित धार्मिक स्थळांवर लक्ष

By Admin | Updated: September 18, 2015 00:11 IST2015-09-18T00:11:25+5:302015-09-18T00:11:25+5:30

वाहतुकीला अडथळा, जातीय तेढ निर्माण करणारी अतिक्रमित धार्मिक स्थळे लवकरच हटविली जाणार आहेत.

Now focus on the encroached religious places | -आता अतिक्रमित धार्मिक स्थळांवर लक्ष

-आता अतिक्रमित धार्मिक स्थळांवर लक्ष

शहरात २०८ स्थळे : उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन होणार
अमरावती : वाहतुकीला अडथळा, जातीय तेढ निर्माण करणारी अतिक्रमित धार्मिक स्थळे लवकरच हटविली जाणार आहेत. शहरात २०८ अतिक्रमित धार्मिक स्थळे असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी मंगळवारी बैठक घेऊन संबंधित विभागाला ही स्थळे हटविण्याबाबत कृती आराखडा तयार करण्याचा सूचना दिल्या आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील अतिक्रमित धार्मिक स्थळे न हटविल्याबद्दल शासनावर ताशेरे ओढले आहेत. विनापरवानगी बांधण्यात आलेली धार्मिक स्थळे हटवून तसा अहवाल शासनाने उच्च न्यायालयाला पाठविण्याचे निर्देश दिले आहेत. हा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करताना दिला आहे.
मात्र, अतिक्रमित धार्मिक स्थळे हटविण्यात आली नसल्याने उच्च न्यायालयाने राज्य शासनावर ताशेरे ओढले.
उच्च न्यायालयाने धार्मिक स्थळांबाबत ओढलेल्या ताशेऱ्यांमुळे शासनाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना पत्र पाठवून त्यांच्या हद्दीतील अतिक्रमित धार्मिक स्थळे जमीनदोस्त करून तसा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: Now focus on the encroached religious places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.