आता आॅनलाईन भरा पाणी बिल !
By Admin | Updated: February 6, 2016 00:13 IST2016-02-06T00:13:32+5:302016-02-06T00:13:32+5:30
आता पाणी बिल भरण्याकरिता रांगेत लागण्याची गरज नसून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ग्राहकांसाठी आॅनलाईन बिल भरण्याची सुविधा सुरू केली आहे.

आता आॅनलाईन भरा पाणी बिल !
सुविधा : अमरावतीत प्रथमच प्रयोग
अमरावती : आता पाणी बिल भरण्याकरिता रांगेत लागण्याची गरज नसून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ग्राहकांसाठी आॅनलाईन बिल भरण्याची सुविधा सुरू केली आहे. राज्यात प्रथमच अमरावतीत हा प्रयोग करण्यात आला आहे.
जीवन प्राधिकरणाकडे शहरात सुमारे ८२ हजार ग्राहक असून दर दोन महिन्यांनी सहा कोटीच्या जवळपास पाण्याची देयके दररोज शहरवासीयांना ९५ दशलशलिटरचा पाणीपुरवठा केला जातो. प्रत्येक ग्राहकाला वेळेवर बिल दिल्यानंतर अनेकदा तारखेपूर्वी बिल भरण्यासाठी ग्राहकांना ताटकळत रांगेत उभे लागत होते. मात्र, आता आॅनलाईन बिल भरण्याची सुविधा जीवन प्राधिकरणाने सुरू केल्याने ग्राहकांचा वेळसुध्दा वाचणार आहे. मुंबईस्तवरील कार्यालयाने आॅनलाईन देयक भरण्याच्या प्रक्रियेला मान्यता दिल्यानंतर २ फेब्रुवारीपासून अमरावतीत आॅनलाईन देयके भरण्याची सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे.
ग्राहकांनी े्नस्र.ेंँं१ं२ँ३१ं .ॅङ्म५.्रल्ल यावर क्लिक केल्यानंतर नागरिक आॅप्शनवर क्लिक करावे. त्यानंतर पाणी देयक भरणा हे आॅप्शन येईल. त्यावर क्लिक केल्यास बिल आधारीत भरणा किंवा बिल शिवाय भरणा, यापैकी पर्याय निवडावा. पर्याय निवडल्यानंतर नवीन विंडोमध्ये उघडणारे बाह्य संकेतवर क्लिक करा. त्यानंतर ओके आॅप्शनवर क्लिक करा. त्यानंतर ग्राहक क्रमांक टाकून नेम आॅफ वॉटर वर्कमध्ये अमरावती वॉटर वर्क्स लिहावे. त्यानंतर व्हॅलिडेट या आॅप्शनवर क्लिक करा. त्यानंतर आपला मोबाईल क्रमांक व व्हेरिफाय कोड टाकून सबमिट आॅप्शनवर क्लिक करा. त्यानंतर टर्म अॅन्ड कंडिशन्स यावर क्लिक करून पेमेन्ट आॅप्शन निवडा. यात इंटरनेट बँकिग, के्रडिट कार्ड, डेबिट कार्ड, एनईएफटी व आरटीजीएस यापैकी एक आॅप्शन निवडा. त्यानंतर पाणी देयके भरण्याची प्रक्रिया पूर्ण होऊन ग्राहकांच्या बिलांचा भरणा होईल. (प्रतिनिधी)
आॅनलाईन देयके भरण्याची सुविधा कार्यान्वित करण्यात येत आहे. ही आॅनलाईन यंत्रणेची ट्रायल घेतली जात असून दोन दिवसांत पूर्णपणे कार्यान्वित होईल.
- किशोर रघुवंशी,
उपविभागीय अभियंता,
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण.