-आता लोकशाहीदिनात पंधरा दिवसांपूर्र्वी तक्रार
By Admin | Updated: September 8, 2016 00:15 IST2016-09-08T00:15:45+5:302016-09-08T00:15:45+5:30
नागरिकांना त्यांच्या तक्रारी थेट अधिकाऱ्यांसमोर मांडण्यासाठी महत्त्वाचा मार्ग असलेल्या लोकशाही दिनाची तक्रारही आता १५ दिवस आधी द्यावी लागणार आहे.

-आता लोकशाहीदिनात पंधरा दिवसांपूर्र्वी तक्रार
प्रशासनाला दिलासा : आॅक्टोबरपासून कार्यवाही
जितेंद्र दखने अमरावती
नागरिकांना त्यांच्या तक्रारी थेट अधिकाऱ्यांसमोर मांडण्यासाठी महत्त्वाचा मार्ग असलेल्या लोकशाही दिनाची तक्रारही आता १५ दिवस आधी द्यावी लागणार आहे. ऐनवेळी येणाऱ्या तक्रारींमुळे नागरिकांनाही योग्य उत्तर देणे प्रशासनाला शक्य होत नसल्याने आता तक्रारींचा अभ्यास करण्यासाठी अधिकाऱ्यांना वेळ मिळणार आहे.
दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. यात नागरिक त्यांच्या भागातील त्यांना भेडसावणाऱ्या समस्या लोकशाही दिनात येऊन अधिकाऱ्यांसमोर मांडतात. यात बहुतांश तक्रारींचा निपटारा जागीच करण्याचा प्रयत्न असतो. परंतु अनेक तक्रारी या प्रत्यक्ष जागेवर गेल्यानंतर त्यांची तीव्रता लक्षात येते.
नागरिक लोकशाही दिनात आल्यानंतर अधिकाऱ्यांकडे तक्रार देतात व प्रशासन काहीच कारवाई करीत नाहीत, अशी ओरड करतात. परंतु आता जिल्हा प्रशासनाकडे नागरिकांना पंधरा दिवस आधी प्रशासनात तक्रार दाखल करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत. याची अंमलबजावणी आॅक्टोंबर महिन्यापासून केली जाणार आहे.
अर्जाचा नमुना उपलब्ध
लोकशाही दिनात तक्रार दाखल करण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या तक्रारींचा नमुना आहे. परंतु ऐनवेळी नागरिक तक्रार देण्यासाठी येत असताना ती तक्रार देखील एका कागदावर लिहिली जाते. त्यामुळे नागरिकांना तक्रारीचा नमुना प्रशासनाकडून प्राप्त करून घ्यावा लागणार आहे.
नागरिकांच्या तक्रारी पंधरा दिवसांपूर्वीच आल्यास ऐनवेळी त्यावर योग्य तोडगा काढणे शक्य होत नाही. त्यामुळे लोकशाही दिनासाठी तक्रारी स्वीकारण्याची बाब विचाराधीन आहे. लवकरच निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली जाईल.
-किरण गित्ते
जिल्हाधिकारी, अमरावती