आता विद्यापीठात परीक्षा अर्ज, नामांकन ऑनलाईनच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:37 IST2021-01-08T04:37:33+5:302021-01-08T04:37:33+5:30
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात यंदापासून परीक्षा अर्ज आणि नामांकन प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे. त्याअनुषंगाने प्रत्येक महाविद्यालयाला लॉगीन ...

आता विद्यापीठात परीक्षा अर्ज, नामांकन ऑनलाईनच
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात यंदापासून परीक्षा अर्ज आणि नामांकन प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे. त्याअनुषंगाने प्रत्येक महाविद्यालयाला लॉगीन आयडी पासवर्ड दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांना प्रत्येक परीक्षेत अर्ज व्यक्तीश: भरण्याची भानगड संपुष्टात येणार आहे.
यूजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार विद्यापीठ, महाविद्यालयांत विद्यार्थ्यांशी निगडित शैक्षणिक बाबी या
ऑनलाईन होणे अपेक्षित आहे. त्यानुसार विद्यापीठाने शैक्षणिक सत्र २०२१ पासून परीक्षा अर्ज व नामांकन प्रक्रिया ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. लर्निंग स्पायरल कंपनीकडे ऑनलाईनची जबाबदारी सोपविली जाणार आहे. आतापर्यंत बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. व अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज ऑनलाईन भरावे लागत होते. मात्र, यापुढे विद्यापीठ अंतर्गत सर्वच शाखांच्या अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज ऑनलाईन भरणे बंधनकारक असणार आहे. हिवाळी २०२० परीक्षेसाठीदेखील ऑनलाईन अर्जप्रक्रियेची सुविधा दिली जाणार आहे तसेच महाविद्यालयात प्रवेशाच्या वेळी नामांकनसुद्धा ऑनलाईन भरावे लागणार आहे.
-----------------
प्रत्येक महाविद्यालयाला स्वतंत्र पासवर्ड
ऑनलाईन परीक्षा अर्ज आणि नामांकन प्रक्रिया वेगवान होण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयाला स्वतंत्र पासवर्ड दिला जाणार आहे. त्याकरिता पोर्टल उघडले जाणार असून, ऑनलाईनची जबाबदारी लर्निंग स्पायरल कंपनीकडे सोपविली आहे. परीक्षा अर्ज आणि नामांकन प्रक्रिया महाविद्यालयांना पूर्णत्वास आणावी लागेल. दरवर्षी अडीच लाख परीक्षा अर्ज, तर एक लाख नामांकन विद्यार्थ्यांकडून विद्यापीठात दाखल होतात.
--------------
अधिकारी, कर्मचारी यांच्यावरील ताण कमी होणार
विद्यापीठाच्या परीक्षा विभागात नियमित अधिकारी, कर्मचारी यांची संख्या फारच कमी आहे. परीक्षा विभागाचा डोलारा मोठा असताना, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरवश्यावर कामकाज पार पाडावे लागते. मात्र, आता यंदापासून परीक्षा अर्ज आणि नामांकन प्रक्रिया ऑनलाईन होणार असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील नक्कीच ताण कमी होईल, अशी माहिती परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.