‘जीएम स्पेशल’चा वापर आता दर चार वर्षांनीच!
By Admin | Updated: September 11, 2014 23:10 IST2014-09-11T23:10:52+5:302014-09-11T23:10:52+5:30
रेल्वेचे महाप्रबंधक आता फक्त शेड्युल निरीक्षणादरम्यान ‘जीएम स्पेशल’ गाडीचा वापर करू शकतील. अन्य कोणत्याही निरीक्षण दौऱ्याच्या वेळी त्यांना सर्वसाधारण प्रवाशांप्रमाणेच राजधानी किंवा

‘जीएम स्पेशल’चा वापर आता दर चार वर्षांनीच!
रेल्वेच्या खर्चात कपात : सामान्य गाड्यांमधून करावा लागणार प्रवास
संजय पंड्या - अमरावती
रेल्वेचे महाप्रबंधक आता फक्त शेड्युल निरीक्षणादरम्यान ‘जीएम स्पेशल’ गाडीचा वापर करू शकतील. अन्य कोणत्याही निरीक्षण दौऱ्याच्या वेळी त्यांना सर्वसाधारण प्रवाशांप्रमाणेच राजधानी किंवा शताब्दी एक्सप्रेसने प्रवास करावा लागेल. शेड्युल निरीक्षण दर चार वर्षांनी होत असल्याने महाप्रबंधकांना ‘विशेष रेल्वे गाडी’ वापरण्याची संंधी आता दर चार वर्षांनीच मिळणार आहे.
रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत कोणत्याही झोनच्या रेल्वे महाप्रबंधकांना कुठल्याही रेल्वे स्थानकाचा दौरा करण्यासाठी १२ डब्यांची विशेष रेल्वे ‘जीएम स्पेशल’ म्हणून दिली जात होती. एवढेच नव्हे, तर त्यांच्यासमवेत २०० कर्मचाऱ्यांचा ताफाही तैनात असायचा. कुठल्याही रेल्वे स्थानकावर त्यांचे विशेष स्वागत केले जाई. परंतु केंद्रातील नव्या सरकारने रेल्वे मंत्रालयातील अनावश्यक खर्चाला कात्री लावण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयांतर्गत शेड्युल निरीक्षणाशिवाय रेल्वे महाप्रबंधकांना ‘जीएम स्पेशल’ गाडीचा वापर करता येणार नाही, असे आदेश रेल्वे विभागामार्फत देण्यात आले आहेत. याच कारणांमुळे अलीकडेच पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक हेमंतकुमार सूरत येथे निरीक्षणासाठी शताब्दी एक्सप्रेसने गेले होते. त्यांच्यासोेबत केवळ दोनच कर्मचारी होते, अशी माहिती रेल्वेच्या सूूत्रांनी दिली आहे.
डीआरएमलाही विश्रांती नाही
रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता प्रत्येक रेल्वे विभागाच्या डीआरएमलासुध्दा शनिवार आणि रविवारी विश्रांती घेता येणार नाही. या दिवशीसुध्दा त्यांना त्यांच्या विभागातील एखाद्या रेल्वे स्थानकाचा निरीक्षण दौरा करून त्याचा अहवाल त्याच दिवशी रेल्वे बोर्डाकडे पाठवावा लागणार आहे. ही नवी सूचना धडकताच रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही घाम फुटू लागला आहे.