- आता डॉक्टर सायकलने करणार क्लिनिकपर्यंतचा प्रवास

By Admin | Updated: August 23, 2014 23:41 IST2014-08-23T23:41:30+5:302014-08-23T23:41:30+5:30

डॉक्टरांनी घरापासून क्लिनिकपर्यंतचा प्रवास सायकलने करावा याकरिता इंडियन मेडिकल असोशियनच्यावतीने सायकल क्लबची स्थापना करण्यात येणार आहे. या उपक्रमातून प्रदूषण कमी करणे

- Now the doctor cycling will be a journey to the clinic | - आता डॉक्टर सायकलने करणार क्लिनिकपर्यंतचा प्रवास

- आता डॉक्टर सायकलने करणार क्लिनिकपर्यंतचा प्रवास

आयएमए पदाधिकाऱ्यांचा निर्णय : आरोग्य सांभाळणे, प्रदूषण कमी करण्याचा उद्देश
अमरावती : डॉक्टरांनी घरापासून क्लिनिकपर्यंतचा प्रवास सायकलने करावा याकरिता इंडियन मेडिकल असोशियनच्यावतीने सायकल क्लबची स्थापना करण्यात येणार आहे. या उपक्रमातून प्रदूषण कमी करणे व आरोग्यविषयक सामाजिक संदेश नागरिकांपर्यंत पोहचविणे हा एकमेव उद्देश राहणार आहे, अशी माहिती आयएमए हॉलमध्ये आयोजित पत्रपरिषदेत दिलीप सारडा यांनी दिली.
पुणे येथील इंडियन मेडिकल असोशियनचे अध्यक्ष दिलीप सारडा यांनी अमरावती येथील आयएमएच्या शाखेला भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रपरिषदेच्या माध्यमातून असोसिएशनने केलेल्या कार्याबाबत माहिती दिली. पत्रपरिषेदला मुंबई येथील जयेश लेले, मिलिंद नाईक, टी.सी. राठोड, मंगेश गुलवाडे, वसंत लुंगे, अरविंद कुलकर्णी, प्रफुल्ल कडू आदी तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती होती. यावेळी सारडा यांनी सांगितले की, महाराष्ट्रात २२० शाखा असून ३५०० सदस्यसंख्या आहे. अमरावती विभागात असोसिएशनचे ६५० सभासद असून विविध उपक्रमाच्या माध्यमांतून जिल्हात आरोग्य सेवा पुरविली जाते. डॉक्टर एक रोल मॉडेल असून त्यांनी आपल्या घरापासून तर क्लिनिकपर्यंतचा प्रवास सायकलने करावा.
डॉक्टरांनी रुग्णालयापर्यंत सायकलने गेल्यास आरोग्य सुधारेल तसेच रुग्ण व नागरिकांपर्यंत सामाजिक संदेश पोहोचेल, असे मत त्यांनी माडंले. टी.सी राठोड यांनी ‘आओ गाव चले’ या योजनेबद्दल माहिती दिली. (प्रतिनिधी)

Web Title: - Now the doctor cycling will be a journey to the clinic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.