आता पाल्याच्या करिअरची चिंता नको!

By Admin | Updated: June 11, 2014 23:00 IST2014-06-11T23:00:42+5:302014-06-11T23:00:42+5:30

आपल्या पाल्याने कोणता कोर्स करावा. दर्जेदार शिक्षण देणारी संस्था कोणती. सर्व शैक्षणिक संस्थेची माहिती घेण्यासाठी किती फिरावे लागणार. वर्षाला किती फी भरावी लागणार, अनुदान मिळेल काय,

Now do not worry about your career career! | आता पाल्याच्या करिअरची चिंता नको!

आता पाल्याच्या करिअरची चिंता नको!

'लोकमत' एस्पायर एज्युकेशन : अवघी शैक्षणिक नगरी एकवटणार एकाच छताखाली
अमरावती : आपल्या पाल्याने कोणता कोर्स करावा. दर्जेदार शिक्षण देणारी संस्था कोणती. सर्व शैक्षणिक संस्थेची माहिती घेण्यासाठी किती फिरावे लागणार. वर्षाला किती फी भरावी लागणार, अनुदान मिळेल काय, असे एक ना अनेक प्रश्न सध्या पालकांच्या

मनात घोळ निर्माण करीत असतील. मात्र, आता आपल्या पाल्याच्या भावी करिअरची चिंता करणे सोडा कारण, खास आपल्यासाठी ‘लोकमत एस्पायअर एज्युकेशन फेअर’चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने सर्व नामांकित शैक्षणिक संस्थेची

इत्थंभूत माहिती एका छताखाली उपलब्ध होणार आहे.
विद्यार्थ्यांच्या भावी करिअरसाठी दिशादर्शक ठरणारे हे प्रदर्शन म्हणजे जणू शैक्षणिक कुंभमेळाच ठरणार आहे. तसेच या उपक्रमाव्दारे व्यावसायिकांनाही हजारो विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहचता येणार आहे.
शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात ‘लोकमत समूहा’तर्फे यंदाही एस्पायर एज्युकेशन फेअरचे आयोजन करण्यात आले आहे.
१३ ते १५ जूनदरम्यान संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन आर्ट गॅलरी, मोर्शी रोड, अमरावती येथे सकाळी ११ ते ९ पर्यंत भव्य शैक्षणिक प्रदर्शनी भरणार आहे. पालक असो वा पाल्य त्यांच्या मनात भावी शिक्षणाविषयीच्या अनेक शंका, कुशंका असतात, त्या प्रत्येक

शंकाचे निराकरण या प्रदर्शनीत होणार आहे. शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ या प्रदर्शनीत आपणास मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय शैक्षणिक क्षेत्रातील महाविद्यालये, शाळा, मेडिकल, इंजिनीअरिंग, आर्किटेक्टचारपासून फॅशन, ग्राफीक्स, इंटिरियर

डिझाईनपर्यंत व रिटेल, आयटीआय, एव्हिएशनपासून मीडिया, अ‍ॅनिमेशन, गेमिंगपर्यंत तसेच विविध विद्यापीठे, प्रोफेशनल क्लासेस, आयटीआय, हॉटेल मॅनेजरमेंट, फॉरेन लँग्वेज, पोलिटेक्निकल, स्पोकल इंग्लिश, लॉ कॉलेज, हॉस्पिटीलिटी मॅनेजमेंट,

कॅपीटल मार्केट या सर्व इन्स्टिट्युट प्रदर्शनीत सहभागी होणार आहेत. एकाच ठिकाणी शैक्षणिक माहितीचा खजिना उपलब्ध होणार असल्याने ग्राहकांचा वेळ व पैसा वाचेल.
एकाच छताखाली हजारो विद्यार्थी व पालकांपर्यंत आपल्या शैक्षणिक संस्थेची माहिती पोहोचविता येणार आहे. प्रत्येकाशी वैयक्तिरित्या संवाद साधून आपल्या उपक्रमाची माहिती देता येणार आहे. यानिमित्ताने नवा वर्ग आपल्या संस्थेशी जोडला जाणार आहे.

अधिक माहितीसाठी जयंत कौलगीकर ९९२२४२७७९४ या नंबरवर संपर्क साधावा.

Web Title: Now do not worry about your career career!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.