आता एफआयआरची प्रत 'व्हॉट्स अॅप'वर
By Admin | Updated: November 17, 2015 00:17 IST2015-11-17T00:17:44+5:302015-11-17T00:17:44+5:30
आता तक्रारकर्त्यांना एफआयआरची प्रत देण्याचा निर्णय पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांनी घेतला आहे

आता एफआयआरची प्रत 'व्हॉट्स अॅप'वर
सीपींचा निर्णय : पोलीस ठाण्यांना सूचना
अमरावती : आता तक्रारकर्त्यांना एफआयआरची प्रत देण्याचा निर्णय पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांनी घेतला आहे. शहरातील दहाही पोलीस ठाण्यांच्या ठाणेदारांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
शहरात १० पोलीस ठाणे असून दररोज शेकडो तक्रारी दाखल होतात. यामध्ये काही तक्रारदार एफआरआयची प्रतसुध्दा मागतात. मात्र, काही तांत्रिक अडचणी अथवा हलगर्जीपणा करीत काही पोलीस तक्रारदारांना प्रत देण्यात कुचरायी करताना आढळून आले आहे. पोलीस महासंचालकांनी एफआरआरची प्रत तक्रारकर्त्यांच्या व्हॉट्स अॅपवर देण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांनी दिल्या आहेत. तक्रारकर्त्यांने तक्रार नोंदविल्यानंतर एफआयआरचे छायाचित्र काढून ते संबंधित तक्रारकर्त्यांना दिले जाणार आहे. (प्रतिनिधी)
ज्या तक्रारकर्त्यांना व्हॉट्स अॅप क्रमांकावर एफआरआय पाहिजे, त्यांना एफआरआयची फोटो कॉपी व्हॉट्स अॅप क्रमांकावर देण्यात येईल. तशा सूचना सर्व पोलीस ठाण्यांत देण्यात आल्या आहेत.
- राजकुमार व्हटकर,
पोलीस आयुक्त.