आता भूमाफियांवर शहर पोलिसांची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:09 IST2021-06-27T04:09:58+5:302021-06-27T04:09:58+5:30
अमरावती/ संदीप मानकर शहरात आतापर्यंत तीन वर्षांत १३ खुले प्लॉट परस्पर विक्री केल्याच्या नोंदी शहर पोलिसांकडे आहेत. बनावट ...

आता भूमाफियांवर शहर पोलिसांची नजर
अमरावती/ संदीप मानकर
शहरात आतापर्यंत तीन वर्षांत १३ खुले प्लॉट परस्पर विक्री केल्याच्या नोंदी शहर पोलिसांकडे आहेत. बनावट कागतपत्रे तयार करून १३ खुले भूखंड हडपल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाला गती देऊन भूमिअभिलेख कार्यालयात बनावट पीआर कार्ड तयार करून खुले प्लॉट विक्री करून फसवणूक केल्याचा प्रकार पुढे आला होता. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. शनिवारी दोघांनाही न्यायालयासमोर हजर केले असता, पीसीआर मिळाला.
बनावट पीआर कार्ड तयार करणे, बनावट सातबारा तयार करणे, खरेदी बनावट तयार करून एकाचा प्लॉट दुसऱ्याला परस्पर विक्रीच्या घटना शहरात अलीकडे वाढल्या आहेत. काही प्रकरणात तर पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्रसुद्धा दाखल केले आहे. काही प्रकरणांचा तपास पोलीस करीत असून, त्यासंदर्भाचे कागदपत्र त्यांनी संबंधित भूमिअभिलेख कार्यालयातून मागितले आहे.
बॉक्स
आर्थिक गुन्हे शाखेत तीन वर्षात फक्त एकच प्रकरण
२५ लाखांवरील आर्थिक फसवणुकीचे प्रकरण दाखल झाले तर संबंधित पोलीस ठाण्यातून त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेत वर्ग करण्यात येतो. मात्र, अमरावती उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयातून कॅम्प परिसरातील भूखंडाचे बनावट पीआर कार्ड तयार करून कोट्यवधींचा भूखंड परस्पर विक्री करण्यात आल्यासंदर्भात गाडगेनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
बॉक्स
अशी झाली फसवणूक
शहरातील कॅम्प परिसरातील ७ हजार ९८ वर्गफूट भूखंडाचे भूमिअभिलेख कार्यालयातून बोगस पीआर कार्ड तयार केले. त्याच पीआर कार्डच्या आधारे कोट्यवधींचा भूखंड परस्पर विकण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणात तपास करून २५ जूनला दोन आरोपींना अटक केली होती. प्रॉपर्टी ब्रोकर संदीप चंद्रकांत राठी (४७, रा. एलआयसी कॉलनी), प्रकाश विठोबा ठाकरे (६०, रा. गुरुदेव नगर मोझरी ता. तिवसा) याला अटक केली. न्यायालयाने दोघांना पोलीस कोठडी सुनावली आहे. ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने तातडीने सूत्रे हलवून आरोपींना अटक केली.
बॉक्स
प्लॉट हडपल्याच्या तक्रारी
२०१८-०६
२०१९-०४
२०२०-०३
बॉक्स
अशी केली जाते फसवणूक
ज्याची मालकी हक्क असलेला प्लॉट आहे. त्यांच्या नावाचा वापर करून बनावट कागतपत्रे तयार करणे, बनावट आधारकार्ड जोडणे, मालकी हक्क असल्याचा बनावट सातबारा तयार करणे, किंवा पीआर कार्ड तयार करणे, ज्या प्लॉटवर ज्यांचे पजेशन नाही असेच प्लॉट हडपले जातात. मात्र ज्यांची लक्ष नाही अशा प्लॉटधारकांना भूमाफिया लक्ष करतात.