इंटरनेटने मिळणार आता जात प्रमाणपत्र

By Admin | Updated: July 12, 2014 23:26 IST2014-07-12T23:26:57+5:302014-07-12T23:26:57+5:30

लाभार्थ्यांना त्वरित जात प्रमाणपत्र मिळावे म्हणून ई-फाईलने जात प्रमाणपत्र देण्याचा अभिनव उपक्रम महसूल विभागाने राबविणे सुरु केले आहे. चांदूर विभागातील तब्बल साडेसातशे प्रकरणे

Now the certificates of going to be done by the internet | इंटरनेटने मिळणार आता जात प्रमाणपत्र

इंटरनेटने मिळणार आता जात प्रमाणपत्र

धामणगाव रेल्वे : लाभार्थ्यांना त्वरित जात प्रमाणपत्र मिळावे म्हणून ई-फाईलने जात प्रमाणपत्र देण्याचा अभिनव उपक्रम महसूल विभागाने राबविणे सुरु केले आहे. चांदूर विभागातील तब्बल साडेसातशे प्रकरणे तीन ते चार दिवसांत निकाली निघालीे आहेत़
जात प्रमाणपत्र काढणे अनेकांसाठी अवघड असले तरी तेवढेच भविष्यात विविध योजना अथवा शैक्षणिक व शासकीय नोकरीसाठी महत्त्वाचे प्रमाणपत्र आहे़ हे प्रमाणपत्र लाभार्थ्यांना लवकर उपलब्ध व्हावे म्हणून चांदूररेल्वेचे उपविभागीय अधिकारी नितीन व्यवहारे यांनी अभिनव उपक्रम राबवायला सुरूवात केली आहे़ चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर या तालुक्यातून ई-फाईलद्वारे या प्रमाणपत्रासाठी लागणारे दस्तऐवज क्रमांकाद्वारे लावले जात आहे़
आदेशपत्र, अर्ज, शाळा सोडण्याचा दाखला, कोटवार बुकाची निक्कल, रेशनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, रहिवासी दाखला, जन्म तारखेचा दाखला, शासन राज्यपत्र किंवा विवाह पत्रिका, परवाण्याची सत्यप्रत, घरपट्टी कर पावती, तसेच बिल, हे दस्तऐवज एकाच फाईलमध्ये दिसते. प्रत्येक कागदपत्र तपासल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांची स्वाक्षरी या ई-फाईलद्वारे पहायला मिळत आहे़ (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Now the certificates of going to be done by the internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.