शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

आता अखर्चित निधीवर केंद्र सरकारचे अंकुश, राज्यातील लेखापालांची पुण्यात कार्यशाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2017 5:05 PM

केंद्र सरकारकडून विविध योजना, उपक्रमांसाठी मिळणारा निधी खर्च झाल्याचे भासवून ते अखर्चित ठेवण्याचा प्रकार राज्य शासनाच्या विविध विभागात उघडकीस आला आहे. त्यामुळे आता केंद्रांच्या निधीची इत्थंभूत माहिती पब्लिक फायन्सियल मॅनेजमेंट सर्व्हिस (पीएमफएस) या नव्या सॉफ्टवेअरमध्ये केंद्र सरकारला कळवावी लागेल.

-  गणेश वासनिक

अमरावती : केंद्र सरकारकडून विविध योजना, उपक्रमांसाठी मिळणारा निधी खर्च झाल्याचे भासवून ते अखर्चित ठेवण्याचा प्रकार राज्य शासनाच्या विविध विभागात उघडकीस आला आहे. त्यामुळे आता केंद्रांच्या निधीची इत्थंभूत माहिती पब्लिक फायन्सियल मॅनेजमेंट सर्व्हिस (पीएमफएस) या नव्या सॉफ्टवेअरमध्ये केंद्र सरकारला कळवावी लागेल. त्या अनुषंगाने राज्यभरातील लेखापालांचे पुणे येथील कार्यशाळेत प्रशिक्षण झाले. आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग, सर्वशिक्षा अभियान, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, पंतप्रधान ग्राम सडक योजना, आवास योजना, सौभाग्य योजना, बेटी बचाओ योजना, जनऔषधी योजना, कृषिविमा योजना, संसद ग्राम आदी योजनांच्या अंमलबजावणीसाठी केंद्रांकडून राज्य शासनाला निधी प्राप्त होते. मात्र, केंद्रांकडून आलेला निधी वेळेपूर्वीच योजना, उपक्रमांवर खर्च न करता तो खर्च झाल्याचे प्रमाणपत्र काही विभागाकडून राज्य शासनाला पाठविले जाते. तथापि, महालेखागार कार्यालयाने केलेल्या आकस्किक तपासणीत केंद्राचा निधी अखर्चित ठेवला जात असल्याचे वास्तव समोर आले आहे. राज्य शासनाच्या एकट्या आदिवासी विकास विभागात केंद्रीय सहाय्य अनुदान एक हजार कोटी रूपये अखर्चित ठेवल्याची बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या निधीतून विकास कामे, शैक्षणिक सुविधा, आरोग्याचा लाभ मिळावा, यासाठी ‘पीएफएमएस’ या नव्या सॉफ्टवेअरमधून राज्याच्या विविध विभागांना निधीबाबत माहिती कळवावी लागणार आहे. परिणामी केंद्र सरकारला एका क्लिकवर राज्य सरकारला दिलेल्या निधीचा प्रवास कळेल, असे नव्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यात आला आहे. केंद्र सरकारचा प्राप्त निधी, योजनांचे नाव, निविदा प्रक्रिया, कार्यारंभ, विकास कामांची स्थिती, काम करणारी एजन्सी आदी माहिती याच सॉफ्टवेअरमध्ये अपलोड करावी लागणार आहे. केंद्र सरकारने पाठविलेला निधी, अनुदान त्याच वर्षी खर्च व्हावे, ते अखर्चित राहू नये, अशी नवे सॉफ्टवेअर विकसित करण्यामागील भूमिका पुणे येथे पार पडलेल्या कार्यशाळेतून स्पष्ट करण्यात आले आहे.

एटीसी, पीओ कार्यालयातील लेखापालांची हजेरीकेंद्र सरकारच्या अखर्चित निधीबाबत पुणे येथे आदिवासी विकास विभागाच्या लेखापालांची दोन दिवसीय कार्यशाळा २७ व २८ नोव्हेंबर रोजी पार पडली. या कार्यशाळेत आदिवासी विकास विभाग अपर आयुक्त (एटीसी) आणि प्रकल्प अधिकारी कार्यालयाचे (पीओ) लेखापाल प्रामुख्याने हजर होते. आदिवासी विकास विभागाचे सहसचिव सुनील पाटील यांनी निधी अखर्चित राहू नये, याबाबत मार्गदर्शन केले.

केंद्र सरकारकडून प्राप्त होणा-या निधीबाबतची माहिती आता ‘पीएमएफएस’ सॉफ्टवेअरद्वारे थेट दिल्ली येथे आॅनलाईन कळवावी लागेल. त्यामुळे निधीचा प्रवास कुठे, कसा सुरू आहे, हे क्षणात केंद्र सरकारला कळेल.- किशोर गुल्हाने,उपायुक्त, (लेखा) आदिवासी विकास विभाग, अमरावती

टॅग्स :AmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्र