आता विद्यार्थ्यांची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने

By Admin | Updated: June 18, 2015 00:16 IST2015-06-18T00:16:47+5:302015-06-18T00:16:47+5:30

राज्यातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या मोजण्यासाठी आता शाळांमध्ये बायोमेट्रिक हजेरी घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.

Now the attendance of students is in biometric method | आता विद्यार्थ्यांची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने

आता विद्यार्थ्यांची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने

आधार कार्ड लिंक : पटसंख्या मोजण्यासाठी शिक्षण विभागाचा निर्णय
सुरेश सवळे चांदूर बाजार
राज्यातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या मोजण्यासाठी आता शाळांमध्ये बायोमेट्रिक हजेरी घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. राज्यातील संपूर्ण विद्यार्थ्यांच्या आधारकार्डची लींक देण्याच्या निर्णयांतर्गत ई-लर्निंगद्वारे हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
राज्यात २०११ साली पडताळणी झाल्यावर अनेक शाळांमध्ये बोगस विद्यार्थी संख्या दाखविण्याचे प्रकार उघडकीस आले. त्यानंतर शालेय शिक्षण विभागाने शाळांमधील पटसंख्या नोंदणीसाठी ‘डाइज’चा उपयोग केला. यात राज्यातील सर्व अनुदानित व विनाअनुदानित शाळांना विद्यार्थीसंख्या, शिक्षक आणि शाळांची माहिती टाकणे अनिवार्य करण्यात आले आहे. याशिवाय राज्यातील शाळांमध्ये ई-लर्निंगवर भर देण्यास सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्यावर भर देण्यात येत असून वर्षभरापासून विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्याची मोहीम युध्दस्तरावर सुरु आहे.

२७ जूनपासून पुन्हा राबविणार मोहीम
शाळास्तरावर २७ जूनपर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार होती. मात्र यादरम्यान शाळा बंद असल्याने मोहीम बंद करण्यात आली. आता शाळा सुरु होताच ही मोेहीम पुन्हा सुरु होणार आहे. राज्यातील सर्व विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड येताच शिक्षकांकडून हजेरीचे काम काढून घेण्यात येईल. कार्यालयाप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यांची नोेंदणी शाळेत लावलेल्या बायोमेट्रिक मशीनद्वारे करण्यात येईल. तसेच त्याला आधारकार्ड लिंक करण्यात येईल. शाळेत येताच विद्यार्थ्यांला आधारकार्ड त्या मशीनला दाखवावे लागेल.
आधारकार्डशी जोणार
राज्यातील सर्वच शाळांत हजेरीसाठी बायोमेट्रिक मशीन लावण्यात येऊन त्याला आधारची लिंक जोडण्यात येणार आहे. या वर्षीपासून त्याची अंमलबजाणी करण्याचा शासनाचा मानस आहे.

विद्यार्थ्यांना आधारकार्डशी जोडण्याची मोहीम सुरू आहे. बायोमेट्रिकच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची हजेरी घेण्याबाबत अद्याप कोणताही आदेश प्राप्त झाला नाही. या मोहिमेसाठी प्रत्येक शाळेत इंटरनेट कनेक्शन व बायोमेट्रिक मशीन उपलब्ध होणे आवश्यक आहे.
- इर्शाद खान,
शिक्षणाधिकारी, चांदूरबाजार.

Web Title: Now the attendance of students is in biometric method

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.