आता शालेय पोषण आहारासाठी ‘अ‍ॅप’

By Admin | Updated: July 21, 2016 00:06 IST2016-07-21T00:06:32+5:302016-07-21T00:06:32+5:30

प्रत्येक शाळेत सुरु असलेल्या शालेय पोषण आहाराची दैनंदिन माहिती जमा करुन ती मोबाईलद्वारे देण्यासाठी शिक्षण विभागाने अप्लीकेशन विकसित केले आहे.

Now 'app' for school nutrition | आता शालेय पोषण आहारासाठी ‘अ‍ॅप’

आता शालेय पोषण आहारासाठी ‘अ‍ॅप’

दैनंदिन माहिती मिळणार : योजनेत पारदर्शकता हा उद्देश
अमरावती : प्रत्येक शाळेत सुरु असलेल्या शालेय पोषण आहाराची दैनंदिन माहिती जमा करुन ती मोबाईलद्वारे देण्यासाठी शिक्षण विभागाने अप्लीकेशन विकसित केले आहे. ‘आॅटोमेटेड मॉनिटरिंग सिस्टीम’ (एमबीएम) असे याचे नाव आहे. शालेय पोषण आहार योजनेत पारदर्शकता यावी, हा याचा उद्देश आहे.
एखाद्या योजनेसाठी विशिष्ट प्रकारचे मोबाइल अप्लीकेशन करण्यास शिक्षण विभाग हा पहिला ठरला आहेत. सद्य:स्थितीत ८६ हजार ६६० शाळांमध्ये ६५ लाख ३६ हजार विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो. या योजनेनुसार राज्यातील किती विद्यार्थ्यांना दुपारी भोजन आहार देण्यात आला, कोणत्या प्रकारचा आहार दिला. याची दररोज आकडेवारी या मोबाईल अ‍ॅप्स द्वारे मिळणार आहे. पुण्यातील एनआयशीने हे अ‍ॅप विकसित केले आहे. याद्वारे शालेय पोषण आहाराची माहिती आॅनलाईन अ‍ॅप व एसएमएस द्वारे गटशिक्षणाधिकाऱ्यांना मिळेल.
तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार मिळावा तसेच कोणत्या प्र्रकारचा आहार देण्यात आला आणि तो कुठल्या कारणांनी दिला गेला नाही याची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांना एका ‘क्लिक’ वर मिळणार आहे. याप्र्रणालीमुळे मुख्याध्यापकांना शालेय पोषण आहाराच्या दैनंदिन नोंदणी ठेवण्याची गरज भासणार नाही तसेच केंद्र प्रमुखांना मासिक अहवाल देण्याची आवश्यकता नाही. अनुदानाचे वितरण ही सुलभ होईल. या योजनेच्या अंमलबजावणीची स्थिती दररोज तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर पाहता येणार आहे. प्रत्येक शाळेत कुठल्या वर्गात किती विद्यार्थी उपस्थित होते याची नियमित मिळणार आहे.

विद्यार्थ्यांची गळती थांबविण्यासाठी प्रभावी उपाय
शाळेतील पटनोंदणीचे प्रमाण शंभर टक्क्यापर्यंत वाढविण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांची गळती थांबविण्यासाठी केंद्र पुरस्कृत शालेय पोषण आहार योजना सुरु करण्यात आली. शालेय पोषण आहार योजनेनुसार किती शाळांमधील विद्यार्थ्यांना दुपारचे भोजन मिळाले, याची नियमित माहिती शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी प्रभावी उपाय केल्या जाणार आहे.

Web Title: Now 'app' for school nutrition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.