आता कचरा डेपो शहरापासून १५ किमी लांब
By Admin | Updated: February 12, 2015 00:16 IST2015-02-12T00:16:37+5:302015-02-12T00:16:37+5:30
नजीकच्या सुकळी येथील महापालिकेचा कम्पोस्ट डेपो रद्द करुन आता तो शहरापासून १५ कि.मी. लांब साकारला जाणार आहे.

आता कचरा डेपो शहरापासून १५ किमी लांब
अमरावती : नजीकच्या सुकळी येथील महापालिकेचा कम्पोस्ट डेपो रद्द करुन आता तो शहरापासून १५ कि.मी. लांब साकारला जाणार आहे. घणकचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करण्यासाठी ताब्यात घेण्यात आलेली शेतकऱ्यांची १८ एकर सुपीक जमीन परत करण्याचा निर्णयदेखील पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी बुधवारी येथे घेतला. गेटच्या आतील नागरिकांनी कम्पोस्ट डेपोत कचरा साठवू देणार नाही, यासाठी मागील तीन दिवसांपासून आंदोलन छेडून कचऱ्याची वाहने येण्यास मज्जाव केला होता, हे विशेष.
महापालिकेत पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या अध्यक्षतेस्थानी कचरा डेपो आणि स्थानिक नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी बैठक पार पडली. या बैठकीला भाजपचे शहराध्यक्ष तुषार भारतीय, महापालिका आयुक्त अरुण डोंगरे, पक्षनेता बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, अविनाश मार्डीकर, चेतन पवार, अजय गोंडाणे, प्रवीण हरमकर, प्रदीप दंदे, बबन रडके, अब्दुल रफिक, वि.दा पवार, अनिल भटकर, उपायुक्त चंदन पाटील, सहायक आयुक्त राहुल ओगले, सहायक संचालक नगर रचना अधिकारी सुरेंद्र कांबळे, स्वच्छता अधिकारी देवेंद्र गुल्हाणे आदी उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविकातून आयुक्त अरुण डोंगरे यांनी कचरा डोपो निर्मितीचा इतिहास विशद केला