शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

कुख्यात वाघ तस्कर कल्ला बावरिया अखेर जाळ्यात, स्टेट टाइगर स्ट्राइक फोर्सची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2023 11:17 IST

मेळघाटातील शिकारीनंतर होता दहा वर्ष फरार; गडचिरोलीतील शिकारीत सहभागाचे धागेदोरे

नरेंद्र जावरे

चिखलदरा (अमरावती) : कुख्यात आंतरराष्ट्रीय व्याघ्र तस्कर आदीनसिंह भर्फ कल्ला बावरिया अखेर मध्य प्रदेशच्या स्टेट टायगर स्ट्राइक फोर्सच्या जाळ्यात शनिवारी अडकला. अनेक दिवसांपासून तो गुंगारा देत होता. दहा वर्षांपूर्वी मेळघाटातील शिकार प्रकरणात त्याचा सहभाग राहिला. तेव्हापासून तो फरार होता. गडचिरोली व ताडोबा प्रकरणातसुद्धा त्याचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्याला मध्यप्रदेशच्या नर्मदापुरम येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. चार दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय व्याघ्र तस्कर आदीनसिंह उर्फ कल्ला बावरिया हा १८ ऑगस्ट रोजी विदिशा-सागर या राज्य मार्गाने जात असल्याची गोपनीय माहिती मध्यप्रदेश स्टेट टायगर स्ट्राइक फोर्सला केंद्राच्या अखत्यारितील वन्यजीव गुन्हे अपराध नियंत्रण ब्यूरोकडून देण्यात आली होती. त्यावर ग्यारस पूर्णनजीक त्याला घेराबंदी करून पकडण्यात आले. त्याला चार दिवसांची कोठडी सुनावण्यात आली असून त्यात तो देशातील अनेक राज्यात केलेल्या वाघांच्या शिकारीचा खुलासा करणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या संपूर्ण घटनेचा खुलासा प्रधान मुख्य वनसंरक्षक (भोपाळ) यांच्या कार्यालयाने केला आहे.

देशातील विविध भागांत शिकारी

आदीनसिंह उर्फ कल्ला बावरिया याचा तामिळनाडू, महाराष्ट्र, आसाम, मेघालय येथील वाघांची शिकार व तस्करी प्रकरणात सहभाग आहे. त्याच्याकडून कातडे, हाडे व इतर अवयव जप्त करण्यात आले आहेत. बावरिया टोळीतील अनेक सदस्यांना यापूर्वीसुद्धा अटक करण्यात आली आहे.

नेपाळमध्ये शिकार, मध्यप्रदेशात बसला लपून

गेल्या अनेक वर्षांपासून फरार असलेला कल्ला बावरिया अटकेच्या भीतीने मध्य प्रदेशच्या विदिशा व सागर जिल्ह्यांमध्ये डेरा टाकून लपून होता. भारताला लागून असलेल्या नेपाळ देशातसुद्धा वाघाची शिकार व अवयवांची तस्करी केल्याचा त्याच्यावर गुन्हा नोंदविला गेला आहे. अनेक वर्षांपासून त्याच्या मागावर विविध राज्यांचे पोलिस, वन आणि व्याघ्र प्रकल्पचे पथक तसेच नेपाळचे सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन ब्यूरो होते, हे विशेष.

२०१३ पासून होता लपून

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात २०१३ मध्ये झालेल्या वाघाच्या शिकार प्रकरणात त्याचा सहभाग आहे. तेव्हापासून तो फरार होता. गडचिरोली व ताडोबा येथील वाघांच्या शिकार प्रकरणात त्याच्या सहकाऱ्यांचा सहभाग आहे. देशातील अजून किती ठिकाणी वन्यप्राण्यांची शिकार व तस्करीत त्याचा सहभाग आहे, याची तपासणी केली जात असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिल्ली येथून ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

महिनाभरापूर्वी गडचिरोलीत टोळीचा पर्दाफाश

आसामच्या गुवाहाटीत पोलिस व वनविभागाने संयुक्त कारवाई करून २८ जून २०२३ रोजी वाघाची तस्करी करतना हरयाणातील बावरिया जमातीचे त्रिकूट पकडले. त्यांच्याकडे वाघाची कातडी व हाडे सापडली. त्यानंतर वन्यजीव गुन्हे नियंत्रण, दिल्ली येथून व्याघ्र प्रकल्प व वाघांचा वावर असलेल्या वनक्षेत्रांमध्ये 'हाय अलर्ट'चा इशारा दिला गेला. या तीन आरापाच्या चाकशात गडचिरोली कनेक्शन उघड झाले. त्यानंतर वाघांच्या शिकारीसाठी तळ ठोकून बसलेल्या आंबेशिवणी (ता. गडचिरोली) येथील संशयित टोळीवर २३ जुलै २०१३ रोजी पहाटे पोलिसांच्या मदतीने वनविभागाने छापा टाकला. तेथे वाघांच्या शिकारीसाठीचे सहा सापळे, धारदार शस्त्रे, वाघांची तीन नखे असे साहित्य आढळले. सहा पुरुष, पाच स्त्रिया व पाच लहान मुले अशा एकूण १६ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

तेलंगणा, आसाम व दिल्ली येथून एकूण १९ जणांना अटक केली आहे. दिल्लीतील निवृत्त वन अधिकाऱ्यालाही या प्रकरणात अटक झाली. लहानग्यांपासून ते ८१ वर्षीय निवृत्त वन अधिकाऱ्याचा आरोपींमध्ये समावेश असल्याने या टोळीच्या तस्करीची व्याप्ती किती मोठी आहे याचा अंदाज येतो. वाघांच्या शिकारीसह अवयवांच्या तस्करीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेला अधिकारीच कायद्याच्या 'जाळ्यात अडकला, यावरून तस्करीच्या व्याप्तीचा अंदाज येतो. आंबेशिवणीत पकडलेले वापर आयु संशयित महिनाभरापासून झोपड्या थाटून गोष्टी राहात होते. दोन वाघांची शिकार करून अवयव कंपनी थेट गुवाहाटीपर्यंत पोहोचले; पण यंत्रणेला कानखबर नाही. हा गाफीलपणा आणखी किती वाघांचे बळी घेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मेळघाटातील वाघ शिकार प्रकरणात आंतरराष्ट्रीय कुख्यात वाघ तस्कर कल्ला बावरिया फरार होता, तर गडचिरोली व ताडोबा येथील प्रकरणात त्याचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे अजून आढळून आले नाही. मध्य प्रदेशच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत यावर समन्वय आहे.

- डॉ. जितेंद्र रामगावकर, क्षेत्र संचालक, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीTigerवाघArrestअटक