शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

राज्याचे प्रधान सचिव, पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना राष्ट्रीय जनजाती आयोगाची नोटीस

By गणेश वासनिक | Updated: August 9, 2023 20:52 IST

जिल्हा परिषदेत १०० बिंदू रोस्टर नाही; महिला कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित

अमरावती: पुणे जिल्हा परिषदेत १९९७ पासून ते २०१३ पर्यंत १०० बिंदूनामावलीनुसार रोस्टरच नाहीत. सेवाज्येष्ठता यादी क्रमानुसार रोस्टर आहे. त्यामुळे आदिवासी कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित राहिले, ही बाब माहिती अधिकारातून पुढे आली आहे. आदिवासी कर्मचाऱ्यांची १०० बिंदूनामावली तयार करणे आणि तपासणी करणे, याकामी पुणे जिल्हा परिषदेत कुचराई झाल्यामुळे राष्ट्रीय जनजाती आयोगाने आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव आणि पुणे जिल्हाधिकारी यांना कलम ३३८ (अ) नुसार नोटीस बजावली आहे. नोटीस मिळाल्यापासून ३० दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत.

पदोन्नतीपासून वंचित राहिलेल्या आदिवासी महिला कर्मचाऱ्याचे नाव सुरेखा तारडे (वरिष्ठ सहायक) असे आहे. त्यांची मूळ नेमणूक जानेवारी १९९९ मधील आहे. २५ वर्षांत त्यांना एकदाच पदोन्नती मिळाली. मात्र एकाच आदेशातील २ गैरआदिवासी कर्मचारी आदिवासी आरक्षणाचा लाभ घेऊन त्यांना १९९९ ते २०२१ पर्यंत तीनदा पदोन्नती मिळाली. ५ गैरआदिवासी कर्मचाऱ्यांची नेमणूक आदिवासींच्या राखीव जागेवर केल्यामुळे खरे असलेले पाच आदिवासी कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित राहिले. त्यामुळे त्यांनी राष्ट्रीय जनजाती आयोगाकडे तक्रार केली आहे.

१०० बिंदूनामावली तयार केली नाही आणि रोस्टर हे सेवाज्येष्ठता यादी क्रमानुसार असल्यामुळे सहायक आयुक्त (मावक) यांनी २ सप्टेंबर २०११ रोजी सेवाज्येष्ठता यादीवरून नोंद अनुक्रमे असलेल्या रोस्टरची तपासणी केली होती. त्याच सहायक आयुक्त (मावक) यांनी पूर्वी केलेली रोस्टर तपासणीतील स्वतःची चूक लक्षात आल्यावर स्वतःच्या बचावासाठी बिंदूवर नोंदी घेऊन चूक सुधारली अन् २ जानेवारी २०१३ रोजी १०० बिंदूनामावलीची तपासणी केली. परंतु सेवाज्येष्ठता क्रमाने रोस्टर नोंद केल्याने आदिवासी कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित राहिले.गेल्या चार दशकांपासून अनुसूचित जमातींच्या राखीव जागा गैरआदिवासींनी बळकावलेल्या आहेत. या जागा रिक्त करण्याबाबत शासनाचे वेळोवेळी आदेश आहे. परंतु बळकावलेले अनुसूचित जमातीचे बिंदू रिकामे केले नाहीत. आदिवासी महिला कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्यासाठी पत्रव्यवहार करणार आहे.- ॲड. प्रमोद घोडाम संस्थापक अध्यक्ष, ट्रायबल फोरम महाराष्ट्र.

टॅग्स :AmravatiअमरावतीPuneपुणे