शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आनंदराव अडसुळांना व्हॉट्स अ‍ॅपद्वारे नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 14:25 IST

नवनीत राणा विरुद्ध खासदार आनंदराव अडसूळ प्रकरणात प्रथमच गैरअर्जदारांना व्हॉट्स अ‍ॅपद्वारे नोटीस बजावण्याची परवानगी न्यायालयाने दिली. त्यानुसार खा. आनंदराव अडसूळ यांना व्हॉट्स अ‍ॅपद्वारे नोटीस पाठविण्यात आली आहे.

ठळक मुद्देन्यायालयाकडून पहिल्यांदाच परवानगीअ‍ॅड. परवेज खान यांनी केला अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नवनीत राणा विरुद्ध खासदार आनंदराव अडसूळ प्रकरणात प्रथमच गैरअर्जदारांना व्हॉट्स अ‍ॅपद्वारे नोटीस बजावण्याची परवानगी न्यायालयाने दिली. त्यानुसार खा. आनंदराव अडसूळ यांना व्हॉट्स अ‍ॅपद्वारे नोटीस पाठविण्यात आली आहे. यासंदर्भात राणा यांचे वकील परवेज खान यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. अमरावतीच्या न्यायवर्तुळातील ही पहिलीच घटना आहे.विधी सूत्रानुसार, लोकसभा निवडणुकीच्या वेळी आक्षेपार्ह भाष्य केल्यामुळे नवनीत राणा यांनी खा. आनंदराव अडसुळांविरुद्ध गाडगेनगर पोलिसांकडे तक्रार नोंदविली होती. त्या तक्रारीवरून खा. अडसुळांसह तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता. मात्र, काही कालावधीनंतर हे प्रकरण रद्दबातल ठरविण्यात आले. याविषयी नवनीत कौर राणा यांनी ४ जून रोजी दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवरील सुनावणीदरम्यान मागील तारखेवर गैरअर्जदार प्रकाश मंजलवार हजर झाले होते, तर खासदार आनंदराव अडसूळ व नितीन तारेकर यांना नोटीस मिळाली नसल्याचा अभिप्राय गाडगेनगर पोलिसांनी न्यायालयात दाखल केला होता. नवनीत कौर राणा यांचे वकील परवेज खान यांनी आनंदराव अडसूळ व नितीन तारेकर यांच्यावर पुन्हा नोटीस काढण्याकरिता न्यायालयात अर्ज केला. सदर प्रकरणात २९ जून रोजी नितीन तारेकरसुद्धा हजर झाले. परंतु, खा. आनंदराव अडसूळ यांच्याबद्दलचा अहवाल पोलिसांकडून दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे राणा यांचे वकील परवेज खान यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या ११ जून रोजीच्या न्यायनिर्णयाचा दाखला देत जिल्हा व सत्र न्यायधीश (५) विमलनाथ तिवारी यांना खा. अडसुळांना व्हॉट्स अ‍ॅपद्वारे नोटीस पाठविण्याची परवानगी मागितली. त्यांचे सहकारी वकील चंद्रसेन गुळसुंदरे यांच्या मोबाइलद्वारे नोटीस बजावण्याची विनंती केली. खासदार अडसुळांना पोलीस नोटीस तामिल करू शकत नाहीत, ही बाब लक्षात घेता त्यांना व्हॉट्स अ‍ॅपद्वारे नोटीस देने आवश्यक असल्याचे अ‍ॅड. परवेज खान यांनी अर्जामध्ये नमूद केले. न्यायालयाने त्यांचा अर्ज मंजूर करून व्हॉट्स अ‍ॅपद्वारे नोटीस पाठविण्याची परवानगी दिली. त्यानंतर तात्काळ खा. अडसूळ यांना नोटीस पाठविण्यात आली. न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी १३ जुलै ही तारीख दिली आहे. या प्रकरणात वकील परवेज खान यांना वकील चंद्रसेन गुळसुंदरे व वकील पराग ठाकरे सहकार्य करीत आहेत.

टॅग्स :Anandrao Adsulआनंदराव अडसूळWhatsAppव्हॉट्सअॅप