कृषी विभागातील समित्यांचे अशासकीय सदस्य पायउतार
By Admin | Updated: February 19, 2015 00:25 IST2015-02-19T00:25:04+5:302015-02-19T00:25:04+5:30
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत शासन धोरणानुसार अस्तित्वात असलेल्या कृषी विभागातील विविध समितींवर नियुक्त केलेले अशासकीय ...

कृषी विभागातील समित्यांचे अशासकीय सदस्य पायउतार
अमरावती : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत शासन धोरणानुसार अस्तित्वात असलेल्या कृषी विभागातील विविध समितींवर नियुक्त केलेले अशासकीय सदस्यांच्या नियुक्ती शासनाने रद्द केल्या आहेत. त्यामुळे या निर्णयाचा फटका जिल्ह्यातील अनेक दिग्गजांना बसला आहे.
राज्यात नव्याने आरुढ झालेल्या भाजपा-शिवसेना सरकारने विविध शासकीय समितींवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्ती रद्द करण्याची मोहीम आरंभली आहे. यानुसार सध्या जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या अध्यक्षतेखाली जवळपास ४० समिती आहेत. त्या समितींवर वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती संस्थांचे प्रतिनिधी व राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांच्या नियुक्ती राजकीय हेतूने केली जातात. मात्र शासन बदलताच आता या सर्वच अशासकीय सदस्यांच्या नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्याची अंमलबजावणी सुरु केली आहे.यानुसार कृषी विभागातील राष्ट्रीय फलोत्पादन विभाग, राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान, कृषी तंत्रज्ञान, व्यवस्थापन यंत्रणा आत्मा, सांख्यिकी, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान आदी कृषी विभागाशी संलग्नित सर्व समितींवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्ती रद्द करण्यात येणार आहे. याचा फटका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना बसला आहे. (प्रतिनिधी)