नोटाबंदीने संत्रा व्यापारात मंदी

By Admin | Updated: December 25, 2016 00:20 IST2016-12-25T00:20:07+5:302016-12-25T00:20:07+5:30

केंद्र शासनाच्या नोटाबंदी झाल्याने या नोटा बंंदी फटका संत्रा उत्पादकांना बसला असून संत्राचे भाव पडले आहे .

Nomination slowdown in orange trade | नोटाबंदीने संत्रा व्यापारात मंदी

नोटाबंदीने संत्रा व्यापारात मंदी

गजानन नानोटकर  पुसला
केंद्र शासनाच्या नोटाबंदी झाल्याने या नोटा बंंदी फटका संत्रा उत्पादकांना बसला असून संत्राचे भाव पडले आहे . त्यातच नोटा बंदीच्या नावाखाली संत्रा व्यापारांच्या गाड्या तपासणी करून अडवून आर्थिक पिळवणूक करीत असल्याने संत्रा व्यापाराना संत्रा खरेदी करण्यास नकार देत आहे. त्यामुळे संत्रा उत्पादक हवालदील झाला आहे.
विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून नावलौकिक असलेला वरूड - मार्शी परिसरात संत्रा पिकाचे चांगले उत्पन्न घेण्यात येते. मात्र शासनाने नोटा बंदीचा निर्णय घेतल्याचा फटका संत्रा उत्पादकासह आदी पिकाच्या उत्पादनाला बसला नोटाबंदीमुळे संत्रा व्यापारांनी संत्रा घेण्याकरिता संत्रा उत्पादकांकडे फिरणे बंद केले आहे. त्यामुळे संत्राचे भाव पडले असून निम्म्यावर आले आहे. संत्रा व्यापारी चेकने व नगदी व्यवहार करायला घाबरत आहेत. सुरुवातीला नोटाबंदीनंतर जुन्या चलनाचा व्यवहार करण्यात आला. परंतु संत्रा उत्पादक जुन्या नोटा घेण्यास तयार नसल्याने व्यवहार थांबले आहे. त्यातच संत्रा व्यापारांच्या गाड्या नोटाबंदीच्या नावाखाली तपासणी करणे सुरू केल्याने व्यापारी वर्गात भीती निर्माण झाल्याने संत्रा व्यापारी शेतात थिरकणे बंद केले आहे. त्यामुळे संत्राचे भाव अर्ध्यावर आले आहे.
विदभार्चा कॅलिफोर्निया म्हणून नावलौकिक असलेल्या या परिारात संत्रा हे मुख्य पीक आहे. नोटाबंदीमुळे बँकेतून मर्यादित रोख काढता येत असल्याने शेतकरी वर्ग अडचणीत आहे. व्यापारी रोखीने संत्रा उत्पादकांशी व्यवहार करणे होत आहे.
पुसला येथील संत्रा उत्पादकांचे तहसीलदाराला निवेदन - नोटाबंदी झाल्यामुळे संत्राचे भाव अर्ध्यावर आले आहे. नोटाबंदीच्या नावाखाली संत्रा व्यापारांची तपासणी होत असल्याने व्यापारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे व्यापारांनी संत्रा उत्पादकांशी आर्थिक व्यवहार बंद केले आहे . संत्रा व्यापारांना मुक्तव्यापार करू द्यावा त्यामुळे संत्राला चांगला भाव मिळेल, अशा मागणीचे निवेदन तहसीलदाराला देण्यात आले. यावेळी शैलेश वायकुळ, आनंदा पाटील, सचिन बगाडे, उमेश बोबडे, किरण देवते, राहुल हुरडे, मिलिंद कांडलकर, राजू वायकुळ, देवानंद अळसपुरे, आशिष चोपडे, पवन डहाके, पंकज डहाके आदी संत्रा उत्पादक उपस्थित होते.

Web Title: Nomination slowdown in orange trade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.