ना शाळा, ना परीक्षा; ५ लाख ११ हजार विद्यार्थ्यांची ‘ढकलगाडी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:10 AM2021-06-24T04:10:08+5:302021-06-24T04:10:08+5:30

पान २ साठी कोरोनाची देण : ऐतिहासिकच ठरले शैक्षणिक वर्ष, दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचाही मार्ग झाला मोकळा अमरावती : विद्यार्थ्यांना दरवर्षी ...

No school, no exams; 5 lakh 11 thousand students 'push cart' | ना शाळा, ना परीक्षा; ५ लाख ११ हजार विद्यार्थ्यांची ‘ढकलगाडी’

ना शाळा, ना परीक्षा; ५ लाख ११ हजार विद्यार्थ्यांची ‘ढकलगाडी’

Next

पान २ साठी

कोरोनाची देण : ऐतिहासिकच ठरले शैक्षणिक वर्ष, दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचाही मार्ग झाला मोकळा

अमरावती : विद्यार्थ्यांना दरवर्षी नियमित शाळेत जाऊन दिलेला गृहपाठ पूर्ण करावा लागयचा. यासोबतच चाचणी, सहामाही आणि वार्षिक परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतरच वरच्या वर्गात प्रवेश मिळायचा. पण, कोरोनाकोपामुळे विद्यार्थ्यांना शाळेत न जाता, परीक्षा न देताही उत्तीर्ण होण्याची संधी मिळाली. यावर्षी पहिली ते बारावीपर्यंतचे तब्बल ५ लाख ११ हजार १२६ विद्यार्थी वर्गोन्नत झाले असून २०२०-२१ हे शैक्षणिक वर्ष त्यादृष्टीने ऐतिहासिकच ठरले आहेत.

जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये जिल्हा परिषद, नगरपालिका आणि खासगीच्या एकूण २ हजार ८९४ शाळा असून, या शाळांमध्ये सध्या ५ लाख ११ हजार विद्यार्थी प्रवेशित आहेत. कोरोनाच्या प्रकोपामुळे विद्यार्थ्यांचे २०२०-२१ हे शैक्षणिक वर्ष घरीच गेले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, ते शिक्षणाच्या प्रवाहात कायम राहावे, याकरिता ऑनलाइन शिक्षणाचा आधार घेण्यात आला. परंतु, ऑनलाइन शिक्षण फारसे काही उपयुक्त ठरले नाहीत. शासनाच्या निर्देशानुसार प्रारंभी नववी ते बारावी व नंतर पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग टप्प्याटप्प्याने सुरू केले होते. मात्र, कोरोनाचा प्रकोप वाढल्यानंतर तेही बंद करण्यात आले. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी तर एकही दिवस शाळेत पाय ठेवला नाही.

कोरोनाकाळात विद्यार्थ्यांचे आरोग्य जास्त महत्त्वाचे असल्याने त्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा विचार करून मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ नुसार पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पुढच्या वर्गात वर्गोन्नत करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले. त्याचप्रमाणे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून त्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पहिली ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी आता उत्तीर्ण होऊन पुढच्या वर्गात गेले आहेत.

--------------

बॉक्स

पहिली, दुसरीच्या विद्यार्थ्यांनी शाळा, शिक्षक बघितलेच नाही

गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचा प्रकोप सुरू असल्याने शाळाही बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही शाळेत जाता आले नाही आणि शिक्षकांना भेटता आले आहे. यावर्षी पहिलीमध्ये असलेले ४० हजार ३६५ विद्यार्थी आणि दुसरीतील ४३ हजार ७५४ विद्यार्थी यांनी प्रवेश घेतला पण, अद्यापही शाळेत पाऊल टाकले नाही. त्यांना आपले शिक्षक कोण, त्यांचे नाव काय, याचा पत्ताच नाही. इतकेच काय, शिक्षकांनीही विद्यार्थ्यांची तोंडओळख झालेली नाहीत. आता यावषीर्ही शाळा सुरू होणार की नाही, याबाबत शंकाच आहे.

-------------

बॉक्स

अशी आहेत विद्यार्थी

खासगी अनुदानित शाळा : २५७६५९

खासगी विनाअनुदानित शाळा : १०५४०५

जिल्ह्यातील एकूण विद्यार्थी : ५१११२६

--------------

बॉक्स

जिल्ह्यातील एकूण शाळा: २८९४

जिल्हा परिषदेच्या शाळा १५८५

Web Title: No school, no exams; 5 lakh 11 thousand students 'push cart'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.