वाढत्या रुग्णसंख्येचे कुणालाही नाही गांभिर्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:13 IST2021-02-14T04:13:11+5:302021-02-14T04:13:11+5:30

खुलेआम उल्लंघन : प्रशासनही शांतच, ना कारवाई, ना जागर प्रशांत काळबेंडे जरूड : शासनाने पुनच्छा हरिओम केल्यानंतर ६ फेब्रुवारीपासून ...

No one is serious about the growing number of patients | वाढत्या रुग्णसंख्येचे कुणालाही नाही गांभिर्य

वाढत्या रुग्णसंख्येचे कुणालाही नाही गांभिर्य

खुलेआम उल्लंघन : प्रशासनही शांतच, ना कारवाई, ना जागर

प्रशांत काळबेंडे

जरूड : शासनाने पुनच्छा हरिओम केल्यानंतर ६ फेब्रुवारीपासून जिल्हयातील कोरोनाबाधित रूग्णांमध्ये मोढी वाढ दिसून येत आहे. रोजचा आकडा ३०० ते ३५० च्या घरात आहे. मात्र, तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात नागरिकांच्या झुंडीच्या झुंडी पाहून कुणालाही कोरोणाचे गांभीर्य नसल्याचे चित्र आहे.

पुर्ववत झालेले ग्रामीण जीवन पाहून ग्रामीण भागातील कोरोनाची भीती संपली आहे. ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामस्थांना अटकाव घालण्यासाठी कुणी नसल्याने व संपूर्ण व्यापारही व आवागमन पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने परिस्थिती हाताबाहेर जात असून आताच परिस्थिती नियंत्रणात आणली नाही तर पुन्हा कोरोनाचा उद्रेक होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्यात आजपर्यंत कोरोना तपासणी करणारे व न करणाºया १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला. तर, कोरोेना संसर्ग झालेल्यांची संख्या ९०० च्या पलिकडे गेली आहे.

मात्र तरिही मृत्यूपासूनचे तेरवीपर्यंतचे सर्व सोपस्कार साधारणत ३०० ते ४०० लोकांच्या उपस्थितीत पार पाडले जात आहेत. अनेक जण मास्क न लावता फिरत असून आता कोरोना लस आल्याने भीती कशाची? अशी नागरिकांची भावना असल्याने, शासनाचा कोणताही निर्बंध वरूड तालुक्यात दिसून येत नाही.

कम्युनिटी स्प्रेड?

ताुलुक्यात कोरोनाचा कम्युनिटी स्प्रेड झाल्याचे दिसून येते. परिसरातील शासकीय व खाजगी डॉक्टर वारंवार जनतेला घरातच राहण्याचे व चेहºयाला मास्क लावण्याचे आवाहन करीत असूनही जनता सैराट झाल्यासारखी वागत असल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे. कोरोनाची लागण झाली तर त्याचे उगमस्थान शोधून काढणे कठीण झाले आहे. कोणत्याही प्रकारचे सुरक्षित अंतर न ठेवता चेहºयावर मास्क न लावता धान्य घेण्यासाठी नागरिकांची गर्दी पाहून, गावात ठिकठिकाणी घोळका करून बसलेले युवा, तरुण, म्हातारे, स्त्रिया पाहून खेड्यात पूर्वीसारखे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: No one is serious about the growing number of patients