शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

‘नो नॅक कॉलेज’ रडारवर, ‘त्या’ ५६ महाविद्यालयांची मान्यता रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2023 11:57 IST

विद्यापीठाच्या आयक्यूएसी संचालकांचे पत्र : प्राचार्यांची उडाली भंबेरी

अमरावती : केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार नॅक मू्ल्यांकन, पुनर्मूल्यांकन नसलेल्या अशासकीय, अनुदानित अथवा विनाअनुदानित अशा जिल्ह्यातील ५६ महाविद्यालयांची मान्यता रद्द होणार आहे. त्याअनुषंगाने विद्यापीठाच्या आयक्यूएसी संचालकांनी ‘नो नॅक कॉलेज’ संदर्भात प्राचार्य, संचालकांना पत्र पाठवून ‘नॅक’चा अहवाल सादर करण्याबाबत कळविले आहे.

राज्याच्या उच्च शिक्षण संचालकांच्या पत्राचा आधार घेत अमरावती विद्यापीठअंतर्गत २३२ महाविद्यालयांवर कारवाई प्रस्तावित आहे. एकदाही नॅक मूल्यांकन व मानांकन न झालेली अशासकीय अनुदानित महाविद्यालये व सद्यस्थितीत नॅक मूल्यांकन व पुनर्मूल्यांकन ईन ॲक्टिव्ह असलेल्या अशासकीय अनुदानित, विनाअनुदानित, कायम अनुदानित महाविद्यालयांना शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्या प्रथम वर्ष प्रवेशाच्या प्रारंभ तारखेपासून आयआयक्यूए नॅक कार्यालयात सादर करणे अनिवार्य केले आहे. तसे न केल्यास महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०२६ मधील तरतुदी व शासन निणर्यात नमूद केलेल्या नॅक मूल्यांकन, मानांकन व पुनर्मूल्यांकन करण्यासाठी अटी व शर्तीचे पालन महाविद्यालये करणार नाहीत, अशा महाविद्यालयांची संलग्नता काढून घेण्याची कारवाई विद्यापीठ करणार, असा थेट इशारा विद्यापीठ प्रशासनाने दिला आहे.

शैक्षणिक वर्ष प्रारंभापासून महाविद्यालयांच्या नॅक मूल्यांकनाबाबतची सद्यस्थिती २९ मे रोजी सायंकाळी ५ वाजतापर्यंत ऑनलाइन माहिती गुगल लिंकवर पाठवावी लागणार आहे. जे महाविद्यालये अशी प्रक्रिया करणार नाहीत, त्यांंची संलग्नता शासन निर्णयानुसार रद्द करण्यात येईल.

- डॉ. संदीप वाघुळे, संचालक, आयक्यूएसी, अमरावती विद्यापीठ.

अमरावती जिल्ह्यातील महाविद्यालयांवर एक नजर...

एकूण महाविद्यालय: ११५

अनुदानित महाविद्यालये : ५२

मान्यता प्राप्त अनुदानित महाविद्यालये: ४७

विनाअनुदानित महाविद्यालय: ६०

मान्यता प्राप्त अनुदानित महाविद्यालय : ९

शासकीय महाविद्यालय: ३

मान्यता प्राप्त शासकीय महाविद्यालय: ३

नॅक महाविद्यालय : ५९

नो नॅक कॉलेज : ५६

नॅक इन ॲक्टिव्ह कॉलेज : ३२

नॅक ‘अ’श्रेणी कॉलेज : १४

नॅक ‘ब’ श्रेणी कॉलेज : ४२

उच्च शिक्षण विभागाने ओढले ताशेरे

राज्याच्या उच्च शिक्षण विभागाचे प्रभारी संचालक डॉ. शैलेंद्र देवळणकर यांनी २३ मे रोजी विद्यापीठांच्या कुलसचिवांना पाठविलेल्या पत्रात ‘नॅक’ विना महाविद्यालये सुरू असल्याबाबत ताशेरे ओढले आहेत. महाविद्यालयांचे मूल्यांकन व पुनर्मूल्यांकन नसल्यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेत अपेक्षित वाढ होत नाही. त्यामुळे उच्च शिक्षणाचे जतन व संवर्धन होण्यासाठी महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन होणे ही काळाची गरज आहे, असे पत्रात नमूद आहे.

टॅग्स :Educationशिक्षणcollegeमहाविद्यालयAmravatiअमरावतीuniversityविद्यापीठ