शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी खरी? EXIT POLL अंदाजानुसार राज ठाकरेंचा सर्वात मोठा पराभव
2
तपोवनाचा मुद्दा, ठाकरे बंधूंची सभा; नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेनेला किती जागा मिळणार?
3
EXIT POLL मध्ये ठाकरे बंधूंना धक्का, संजय राऊतांचा खळबळजनक दावा; 'त्या' बैठकीत काय शिजलं?
4
अमेरिका-इराणमध्ये तणाव, इराणने हवाई क्षेत्र केले बंद, एअर इंडिया आणि इंडिगोने ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी केली जारी
5
भारतीय कोस्ट गार्डची कारवाई; भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी नौकेसह 9 ताब्यात
6
Municipal Election 2026 Exit Poll Live: मुंबईत ठाकरेंना झटका बसणार, युतीला किती जागा मिळणार?
7
PMC Election Exit Poll 2026: पुण्यात भाजपाच राहणार की, राष्ट्रवादी बसणार सत्तेत, कौल कुणाला?
8
Pune Election: मतदार येरवडा तुरुंगात, पण मतदान केंद्रावर त्याच्या नावावर झालं मतदान
9
मोठा दणका! निवडणूक ड्युटीवर 'दांडी' मारणाऱ्या १५५ कर्मचाऱ्यांवर छत्रपती संभाजीनगरात गुन्हा
10
BMC Election 2026 Exit Poll: ३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा एक्झिट पोल
11
'निवडणूक मतदान प्रक्रियेत क्रांतिकारी बदल झाले पाहिजेत'; सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टच सांगितलं
12
TMC Election 2026 Exit Poll: ठाण्यात शिंदेसेना मारणार मुंसडी! उद्धवसेना, भाजपाला किती जागा मिळणार?
13
iPhone: आणखी स्वस्त झाला आयफोन; रिपब्लिक सेलआधीच मोठा धमाका! कुठं मिळतोय इतका स्वस्त?
14
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
15
महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे, किती टक्के मतदान? मुंबईच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष
16
"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?
17
 10 Minute Delivery: १० मिनिटांत डिलिव्हरी बंद, पण 'इन्सेंटिव्ह'साठी जीवघेणी शर्यत सुरूच! 
18
मतदान सुरू असतानाच जळगाव शहरात गोळीबार; प्रकरण काय, पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
19
भयंकर, अटल आणि असह्य; लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर'चा नवीन व्हिडीओ आला समोर, पाकिस्तानचा विध्वंस
20
Vijay Hazare Trophy 1st Semi Final : करुण नायरची कडक खेळी; पण Ex समोर शतकी डाव फसला अन्... (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

चार महिन्यांपासून मानधन नाही, आता कंत्राटींनी काढली किडनी विकायला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 13:37 IST

Amravati : अमरावती येथील पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांची आपबीती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषद पाणीपुरवठा स्वच्छता विभागात कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे गेल्या चार महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. मानधनासाठी अनेकदा आंदोलने केल्यानंतरही शासनाकडून दखल घेतली गेली नसल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी किडनी विकण्याचा पवित्रा घेतला आहे.

ग्रामीण जिल्हा परिषदेतील पाणीपुरवठा व स्वच्छता मिशनमध्ये गेल्या १५ ते २० वर्षांपासून कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे गेल्या ४ महिन्यांपासून वेतनाविना त्यामुळे त्रस्त राहण्याची वेळ ओढवली आहे. कर्मचाऱ्यांनी किडनी घेता का कोणी किडनी... असा पवित्रा घेतला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे त्यांनी हा मुद्दा जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्यापासून ते थेट या विभागाच्या मंत्र्यांपर्यंत पोहोचविला. परंतु याची कुठल्याही प्रकारे दखल घेतली जात नसल्याची खंत या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. पाणी व स्वच्छता मिशन या विभागात ५० हून अधिक कर्मचारी आहेत. यापैकी ४२ कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या चार महिन्यांपासून झाले नाही. आज ना उद्या वेतन मिळेल, या अपेक्षेवर त्यांनी आपली नियमित कामे सुरूच ठेवली आहेत. परंतु चार महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही वेतन न झाल्याने अलीकडे त्यांना आर्थिक चणचणीला तोंड द्यावे लागत आहे.

उदरनिर्वाह झाला कठीण

  • गेल्या चार महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने साधारणतः ६० लाख रुपये थकीत आहेत.
  • घरी लागणारा किराणा, कपडे आदी त्यांनी उधारीवर प्राप्त केले, परंतु मुलांच्या शाळांचे शुल्क, वृद्धांचे औषधोपचार आदी बाबींसाठी मात्र त्यांची मोठी कसरत होत आहे.
  • या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या ३ मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी शासनाशी चर्चा करून हा मुद्दा सोडवावा, अशी मागणी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांनी केली आहे.

 

"कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या वेतनाबाबत मी संबंधित विभागाच्या प्रधान सचिवांना गेल्या आठवड्यातच पत्र पाठविले. परंतु अद्याप काहीही तोडगा निघाला नाही. बुधवारी पुन्हा त्यांच्याशी संपर्क साधला असून, स्मरणपत्रही देत आहे. याबाबत लवकरच तोडगा निघेल, अशी अपेक्षा आहे."- संजीता महापात्र, मुख्य कार्यपालन अधिकारी, जिल्हा परिषद

English
हिंदी सारांश
Web Title : Unpaid for months, contract workers threaten to sell kidneys.

Web Summary : Facing financial hardship due to four months of unpaid wages, contract workers in the Zilla Parishad's water supply department are threatening to sell their kidneys. Despite appeals to authorities, their plight remains unaddressed, leaving over 40 employees in dire straits.
टॅग्स :AmravatiअमरावतीGovernmentसरकार