शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

अमरावतीत पाणी शुद्धतेची ‘नो गॅरंटी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 10:22 PM

आरोग्याशी खेळ : ९० हजारांवर कुटुंबांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून पुरवठावैभव बाबरेकर ।आॅनलाईन लोकमतअमरावती : पाणी हे जीवन आहे; मात्र अमरावतीकरांना ते नळातून १०० टक्के शुद्ध मिळेलच, हे ठामपणे सांगता येत नसल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या भोंगळ कारभारावरून लक्षात येते. शहरातील ९० हजारांवर कुटुंबीयांपर्यंत पाणी पोहचविणाऱ्या मजीप्राचे काही पाणी नमुने दूषित आढळत आल्याने ...

आरोग्याशी खेळ : ९० हजारांवर कुटुंबांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून पुरवठावैभव बाबरेकर ।आॅनलाईन लोकमतअमरावती : पाणी हे जीवन आहे; मात्र अमरावतीकरांना ते नळातून १०० टक्के शुद्ध मिळेलच, हे ठामपणे सांगता येत नसल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या भोंगळ कारभारावरून लक्षात येते. शहरातील ९० हजारांवर कुटुंबीयांपर्यंत पाणी पोहचविणाऱ्या मजीप्राचे काही पाणी नमुने दूषित आढळत आल्याने हा धक्कादायक प्रकार उघड होत आहे.सिंभोरा ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आलेली पाइप लाइन बहुतांश मुख्य रस्त्यालगत आहे. मात्र, शहरातील अंतर्गत भागात पाइप लाइन काही ठिकाणी नाल्यांमधून गेली आहे. तेथे या पाइप लाइनमध्ये शिरणारे सांडपाणी नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण करीत आहे. पाण्याच्या शुद्धतेची हमी देणाऱ्या मजीप्राकडून पाणी तपासणी ही झोननिहाय केली जाते. मात्र, या झोनमधील कर्मचाऱ्यांचा एकमेकांशी समन्वय नसल्याचे आढळून येत आहे. पाणीपुरवठा होणाºया ठिकाणाचे पाणी नमुने घेऊन त्याची ओटी टेस्ट केली जाते.ओटी टेस्टसाठी पाणी नमुन्यात एक केमिकल टाकले जाते. केमिकल पाण्यात पडताच पाण्याला पिवळा रंग आल्यास क्लोरिनचे प्रमाण सिद्ध होते. पिवळा रंग आला नाही, तर ते पाणी दूषित समजण्यात येते. ही प्राथमिक तपासणी मजीप्राचे कर्मचारी करतात की नाही, याबाबत निश्चित सांगता येणे कठीणच आहे. पाणी नमुन्यासंबंधी आकडेवारीचा लेखाजोखा ठेवला जात नसल्याचेही आढळून येत आहे.ओटी टेस्ट ही मजीप्रा कर्मचारी करतात, तर अनुजीव तपासणीसाठी पाणी नमुने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येतात. या तपासणीमध्ये १० टक्के पाणी नमुने दूषित असल्याचे आढळून आले आहे. यावर उपाययोजनेसाठी मजीप्रा प्रयत्न करीत आहे. तथापि, आजपर्यंत १०० टक्के पाणी शुद्धतेची हमी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून मिळत नसल्याचे दिसून येत आहे. अमरावतीकरांच्या आरोग्याशी अशाप्रकारे खेळ केला जात आहे.दर तासाला पाच हजार लिटर पाणी वायासिंभोऱ्यावरून अमरावतीकडे येणारी ही पाइप लाइन जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी पोहचवते. या मार्गातील हॉटेल चाणक्यजवळील सर्व्हिस रोडवर पाण्याची गळती होत आहे. वडगावजवळील स्टोन के्रशरमधील ट्रकच्या आवागमनामुळे ही पाइप लाइन फुटल्याचा मजीप्रा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. तासभरात पाच हजार लिटर पाणी पाइप लाइनमधून बाहेर पडत असल्यामुळे दररोज लाखो लिटर पाणी वाया गेले. १६ डिसेंबर रोजी ही गळती सुरु झाली असून, गेल्या दोन दिवसांत लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे. पाणी गळती थांबविण्यासाठी मजीप्रा १९ डिसेंबरपासून कार्यवाही करीत आहे. यामुळे पाणीपुरवठ्याबाबत मजीप्रा किती तत्परतेने काम करते, हे यावरून दिसून येत आहे.पाणी तपासणीचा ताळमेळ नाहीमजीप्राच्या १६ टाक्यांवरून अमरावती व बडनेऱ्यातील नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. मजीप्राच्या आठ झोनमधील कर्मचारी ओटी टेस्टद्वारे पाणी नमुने तपासतात. दररोज प्रत्येक झोनमध्ये दोन ते तीन पाणी नमुने तपासणी होत असल्याचे मजीप्रा अधिकारी सांगत असले तरी काहीच पाणी नमुने दूषित आढळून येतात. पाणी तपासणीच्या माहितीचे रेकॉर्ड मजीप्राकडे उपलब्ध असायला हवे. मात्र, ते एकत्रित केले जात नाही. झोनमधील अधिकारी-कर्मचाऱ्यामध्ये सन्मवय नसल्याने पाणी तपासणीची योग्य आकडेवारी मिळत नाही.मजीप्राच्या पाणी नमुन्यांची स्थितीमजीप्राच्या कर्मचाऱ्यांनी शहरातील विविध ठिकाणांवरून घेतलेले पाणी नमुने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येतात. आॅक्टोबर महिन्यात मजीप्राकडून प्राप्त झालेल्या ७८ पाणी नमुन्यांपैकी सहा पाणी नमुने दूषित आढळून आले. त्याचप्रमाणे नोव्हेंबर महिन्यात ७० पाणी नमुन्यांपैकी सात पाणी नमुने दूषित आहेत. यामध्ये सरस्वतीनगर, साधना कॉलनी, हर्षराज कॉलनी, खडकारीपुरा, राजहिलनगर, प्रवीणनगर, भाजीबाजार, अंबागेट जैन मंदिर या परिसराचा समावेश आहे.महापालिका : ७० नमुने दूषितमजीप्राकडून महापालिका क्षेत्रात पाणीपुरवठा केला जातो. महापालिकेच्या अख्त्यारित येणाºया शाळा, रुग्णालये व अन्य संस्थांची पाणी देयके महापालिकेकडून अदा केली जातात. या अनुषंगाने महापालिकेकडून आॅक्टोबर महिन्यात १५८ पाणी नमुने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी तब्बल ४४ पाणी नमुने दूषित आढळून आले आहेत, तर नोव्हेंबरमध्ये १३७ पैकी २६ पाणी नमुने दूषित आले आहेत.गळतीचे प्रमाण ३० टक्क्यांवरसिंभोरा धरणातून २५ ते ३५ किलोमीटरची पाइप लाइन मासोदच्या जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचली आहे. येथून दररोज १०० दशलक्ष लिटर पाणी अमरावतीकरांना मिळते. प्रत्येक व्यक्तीला १३५ लिटर पाणीपुरवठा ग्राह्य धरला जातो. मात्र, या शहरातील पाइप लाइनमधून काही ठिकाणी पाणीगळती सुरूच आहे. आतापर्यंत गळतीचे प्रमाण ४५ टक्क्यांवर होते. मात्र, आता ते प्रमाण कमी होत ३० टक्क्यांवर आले आहे.अनुजीव तपासणीत काय पाहतात?जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेतील वैज्ञानिक पाणी नमुन्यात केमिकल टाकून पाण्यात कॉलीफॉम जिवाणू आहे किंवा नाही, याचा शोध घेतात. शास्त्रीय पद्धतीने ही तपासणी केल्यानंतर ते पाणी पिण्यास योग्य आहे किंवा नाही, याचा शेरा देतात. दूषित पाण्यात आढळणाºया पाण्यात बॅक्टेरिया असल्याचे सिद्ध होते. बॅक्टेरियामुळे बहुतांश जलजन्य आजारांची उत्पत्ती होत असल्याचे प्रयोगशाळेतील तज्ज्ञांचे मत आहे.मजीप्राचे कर्मचारी नियमित सॅम्पल घेऊन ओटी टेस्टद्वारे पाणी तपासणी करतात. पाणी दूषित आढळल्यास पाइपलाइनमधील गळतीचा शोध घेतला जाते. त्यानुसार पुढील उपाययोजना केली जाते.- किशोर रघुवंशी, उपविभागीय अभियंता, मजीप्रा.माती किंवा सांडपाण्यातून गेलेल्या पाणी पाइनलाइनमध्ये गळती असेल, तर अशा पाण्यामुळे आजारांची उत्पत्ती होते. अ‍ॅसिडीटी, पोटाचे आजार व काविळसह टायफाईडसारखे संसर्गजन्य आजार बळावतात.- अतुल यादगिरे, कॅन्सर सर्जन, अमरावती.