शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात वनवणवा नियंत्रणासाठी तोकडी यंत्रणा, निधीची वानवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2018 16:03 IST

राज्यातील एकूण वनक्षेत्रापैकी निम्म्याहून अधिक विदर्भातील वनक्षेत्र दरवर्षी उन्हाळ्यात स्वाहा होत असताना वणवा नियंत्रणात आणण्यासाठी अत्याधुनिक उपकरणे आणण्यात वनविभाग अपयशी ठरले आहे.

- गणेश वासनिक अमरावती - राज्यातील एकूण वनक्षेत्रापैकी निम्म्याहून अधिक विदर्भातील वनक्षेत्र दरवर्षी उन्हाळ्यात स्वाहा होत असताना वणवा नियंत्रणात आणण्यासाठी अत्याधुनिक उपकरणे आणण्यात वनविभाग अपयशी ठरले आहे. आग विझविण्याचे प्रशिक्षण नसल्याने एका वनरक्षकाचा आगीत होरपळून जीव गेला आहे.सध्या आगीचा हंगाम सुरू झाल्याने वनविभाग अलर्ट झालेला आहे. सर्वाधिक आगीची भीती राज्यातील पाच व्याघ्र प्रकल्पांना यासोबत प्रादेशिक वनविभागाच्या जंगलास आहे. गतवर्षी विदर्भातील वनक्षेत्रास लागलेल्या आगीत जवळपास २५ हजार हेक्टर वनक्षेत्र जळून खाक झाले होते. यावर्षीसुद्धा वनविभागास वनक्षेत्रास लागणा-या आगीची चिंता आहे. त्यामुळे वनक्षेत्रामध्ये फायर लाईन कापणे व जाळण्याचे काम युद्धस्तरावर सुरू झाले असले तरी सदर कामास आवश्यक निधी उपलब्ध होत नसल्याचे वनविभागाची गोची झाली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत वनक्षेत्रास लागणारी आग ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून केंद्र शासनाने जाहीर केले आहे. जिल्ह्यातील वनक्षेत्रास लागणाºया वनवणव्याचे नियोजनासाठी राज्य शासनाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार केली असून विभागीय स्तरावर विभागीय आयुक्त व मुख्य वनसंरक्षकांची समिती गठित असताना या समितीचा बोजवारा उडाला आहे. समितीला डी.पी.सी.डी.च्या फंडातून वनवणवा नियंत्रणाकरिता निधी देण्याचे धारिष्ट्य होत नाही. 

वाहनांचीही वानवाआग नियंत्रणासाठी उन्हाळ्याच्या हंगामात वनविभागास कोणत्याही विभागाची वाहने किंवा कर्मचारी बोलाविण्याचा अधिकार आहे. तसे अधिकार विभागीय आयुक्त व प्रादेशिक, परिवहन अधिका-यांना देण्यात आलेला असतानासुद्धा वनविभागास इतर विभागाची वाहने किंवा कर्मचारी उपलब्ध होत नाही.

वनरक्षकाचा बळीजुन्नुर येथे कार्यरत नागठाणे नामक वनरक्षक हे जंगलातील आग नियंत्रण करीत असताना आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाला. मात्र, वनविभागाकडे पुरेसे ब्लोअर मशीन नसल्याने वनरक्षकांना पाण्याच्या सहाय्याने वनांतील आग नियंत्रित करावी लागते.

टॅग्स :fireआगAmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्र