अचलपूर तालुक्यातील काकडा गावात प्रवेशबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:12 AM2021-05-08T04:12:32+5:302021-05-08T04:12:32+5:30

शिंदी बु. : कोरोनाचा प्रादुर्भाव व रुग्णाची वाढती संख्या बघता, अचलपूर तालुक्यातील काकडा हे गाव सील करण्याचे आदेश ...

No entry in Kakada village in Achalpur taluka | अचलपूर तालुक्यातील काकडा गावात प्रवेशबंदी

अचलपूर तालुक्यातील काकडा गावात प्रवेशबंदी

Next

शिंदी बु. : कोरोनाचा प्रादुर्भाव व रुग्णाची वाढती संख्या बघता, अचलपूर तालुक्यातील काकडा हे गाव सील करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी तालुका प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार ४ मेपासून काकडा गावातील सर्व रस्ते बंद करण्यात आले असून, गावात पूर्ण प्रवेशबंदी करण्यात आली आहे. पुढील आदेशापर्यंत हे गाव सील राहणार आहे.

गाव सील केल्याचे छायाचित्र ग्रामपंचायतने त्याच दिवशी जिल्हा व तालुका प्रशासनास पाठविले आहे. या गावातील नागरिक गावा बाहेर जाणार नाही व गावाबाहेरील लोक गावात येणार नाही, याकरिता गावाचे रस्ते पूर्णतः बंद करण्यात आली आहे. प्रशासनाचे आदेशापर्यंत गाव सील राहील व आदेशाचे पूर्ण पालन ग्रामपंचायतीद्वारे केले जाईल, अशी माहिती काकडा येथील सरपंच ईश्वरदास वानखडे यांनी दिली.

Web Title: No entry in Kakada village in Achalpur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.