शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस भरतीत कारागृह रक्षक पदांना ‘नो चान्स’, गृह खात्याकडे प्रस्ताव नाही

By गणेश वासनिक | Updated: December 5, 2022 15:37 IST

वरिष्ठ प्रभारींमुळे सावळा गोंधळ, कारागृह प्रशासनात ३५० रक्षक पदे रिक्त, मानवाधिकाऱ्यांचे हनन

अमरावती : राज्य सरकारने पोलीस भरती राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रक्रिया आरंभली असून, १५ डिसेंबरपर्यत उदेवारांना अर्ज सादर करता येणार आहे. मात्र, या पोलीस भरतीत कारागृह रक्षकांची पदभरती होणार नसल्याने ३५० पदांचा बॅकलॉग जैसे थे राहणार आहे. कारागृह रक्षक पदांची डिमांड शासनाकडे करण्यात आली नाही. त्यामुळे पोलीस भरतीत कारागृह रक्षक पदांच्या भरतीबाबत नोंद नसल्याची माहिती आहे.

राज्याच्या कारागृह प्रशासनात अतिरिक्त पोलीस महासंचालक हे पद प्रभारी आहे. कारागृह प्रशासनात पोलीस उपमहानिरीक्षक ३, उपविभागीय पोलीस अधीक्षक १३, तुरूंगाधिकारी १०० पदे, मध्यवर्ती कारागृह अधीक्षक ७ तर, कारागृह रक्षकांची ३५० पदे रिक्त आहेत. राज्य शासन प्रत्येक वेळी पोलीस भरतीसाेबत कारागृह रक्षकांची पद करीत असते. मात्र, कारागृह प्रशासनाकडून रक्षकांच्या पदांसंदर्भात मागणी न आल्याने ही पद भरती होऊ शकत नाही. गत काही वर्षांपासून कारागृह प्रशासनात अनेक पदे रिक्त असताना याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त बंदीजनांची संख्या असल्याने अंतर्गत सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बंदीजनांच्या मानवाधिकारावरही गदा येत असल्याबाबतची याचिका गत दोन वर्षापूर्वी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या अनुषंगाने उच्च न्यायालयाने राज्य शासनाला रिक्त पदांची भरती करून तसा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहे. तरिही कारागृह प्रशासनाचा कारभार ‘आंधळं दडतेयं अन्‌ कुत्र पीठ खातेयं’ असा सुरू आहे. राज्यात कैदी क्षमता २४७२२ तर बंदिस्त कैदी ४२८६० असून अधिकारी, कर्मचाऱ्यांची एकूण ५०६८ रिक्त पदे आहेत.एडीजींनी प्रस्ताव पाठविला नाही

राज्य सरकारने पोलीस भरतीचा निर्णय घेतल्यानंतर कारागृहात रक्षकांची ३५० पदे रिक्त आहे. तरिही कारागृह रक्षक पद भरतीसंदर्भात प्रभारी अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी प्रस्ताव पाठविला नसल्याची माहिती आहे. त्यामुळे पोलीस भरतीसोबत कारागृह रक्षक पदभती होणार नाही, अशी माहिती आहे. कारागृह प्रशासनात वरिष्ठांचा कारभार सुद्धा प्रभारी असल्याने सावळागोंधळ सुरू आहे. 

कारागृह रक्षकांच्या रिक्त पदांबाबत अगोदर मुख्यालयातून शासनाकडे माहिती पाठविण्यात आली नव्हती. मात्र, ही बाब लक्षात येताच कारागृह प्रशासनाच्या मुख्यालयातृून रक्षकांच्या पदभरतीबाबत पत्र पाठविले आहे, त्यामुळे पोलीस भरतीसोबत कारागृह रक्षक भरतीची जाहिरात निघेल.

- स्वाती साठे, डीआयजी, कारागृह विभाग. पुणे

टॅग्स :PoliceपोलिसjobनोकरीGovernmentसरकार