पोलिसांच्या अर्थकारणामुळेच कारवाई नाही
By Admin | Updated: July 2, 2016 00:17 IST2016-07-02T00:17:06+5:302016-07-02T00:17:06+5:30
अनेक खासगीे बसेसने पंचवटी व पीडीएमसी कॉलेज चौकात शिरकाव केला, हे नियमबाह्य आहे.

पोलिसांच्या अर्थकारणामुळेच कारवाई नाही
नागरिकांचा सवाल : अपघात झाल्यास जबाबदार कोण ?
अमरावती : अनेक खासगीे बसेसने पंचवटी व पीडीएमसी कॉलेज चौकात शिरकाव केला, हे नियमबाह्य आहे. यामुळे इतर वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून बसेस शिरल्यावरही कारवाई होत नाही. याला बस मालकच्यावतीने पोलिसांना महिन्याकाठी मिळत असलेले अर्थकारणच कारणीभूत असल्याची चर्चा आहे. यामुळे या मार्गावर मोठा अपघात झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
येथील पंचवटी चौकात अनेक कंपनीच्या खासगी बसेस नियमबाह्य प्रवासी वाहतूक करतात. मागील दोन वर्षांपूर्वी या बसेस तत्कालीन पोलीस आयुक्तांनी अधिसूचना काढून शहराबाहेर काढल्या होत्या. पण अनेक महिन्यांपासून या बसेसने अवैधरीत्या शहरात शिरकाव केला असून येथील डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय येथे त्या दिवसभर उभ्या राहतात. इतर वाहतुकीला अडथळा निर्माण करतात. यापूर्वी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी यामध्ये कोण दोषी आहे, ते तपासण्यात येईल व आरटीओची काय भूमिका आहे. या संदर्भात विचारणा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. पण पाच दिवस होऊनही कुठलीच कारवार्इंची दिशा ठरली नाही. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी पुढाकार घेऊन कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. पोलीस आयुक्त जर गाडगेनगर वाहतूक पोलिसांना पाठीशी घालत असतील तर सामान्य जनतेने न्याय कुणाजवळ मागावा व हा प्रश्न कसा निकाली निघेल असे नागरिक आता बोलू लागले आहे. (प्रतिनिधी)
आरटीओचे अधिकारीही निष्क्रीय
नियमांचे उल्लंघन करुन नियमबाह्य प्रवासी वाहतूक खाजगी बसेस करीत असतील तर आरटीओच्या अधिकाऱ्यांनाही कारवाई करण्यांचा अधिकार आहे. या बसेस ला परवाना आहे. की नाह पार्र्सींग कठली आहे. परवाना नुतनीकरण केला आहे की नाही यासंदर्भात कारवाई करायला पाहिजे पण असे होत नाही ? त्यामुळे या खाजगी बसेसच्या चालकांवर कारवार्इंचा बडगा केव्हा उगारणार असा प्रश्न पडत आहे.
खाजगी बसेस शहरात नियमबाह्य शिरल्या असतील व नियमांचे उल्लंघन करीत असतील तर त्याच्यांवर कारवाई करण्यात येईल.
- श्रीपाद वाडेकर
प्रादेशिक परिवहन अधिकारी