वडाळी राखीव जंगलात प्रवेशास मनाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 05:01 IST2020-04-13T05:00:00+5:302020-04-13T05:01:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वन्यजीव आणि वनांच्या सुरक्षेसाठी वडाळी दक्षिण वनबीट जंगल क्षेत्रात प्रवेश मनाई करण्यात ...

वडाळी राखीव जंगलात प्रवेशास मनाई
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वन्यजीव आणि वनांच्या सुरक्षेसाठी वडाळी दक्षिण वनबीट जंगल क्षेत्रात प्रवेश मनाई करण्यात आली आहे. वन अधिकारी, कर्मचारी यांच्याशिवाय कोणालाही प्रवेश नाही, असे फलक सीमेवर झळकू लागले आहेत.
राज्यात व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य, राष्ट्रीय उद्याने, वन विभागाचे उद्याने ३० एप्रिलपर्यत ‘लॉकडाऊन’ करण्यात आले आहे. मात्र, संचारबंदीच्या काळात वन्यजीवांची शिकार, जंगलाना आगी लागण्याचा घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे वनकर्मचाऱ्यांनी शहराला जोडणाऱ्या जंगलाचे मार्ग सीमेवर सील केले आहे. राखीव वने, जंगलात कोणत्याही व्यक्तीने प्रवेश करू नये, यासाठी सीमेवर फलक लावण्यात आले आहे. जंगलात प्रवेश मनाई आदेश असे ठळकपणे फलक लावण्यात आले आहे. वडाळी वनपरिक्षेत्र अंतर्गत दक्षिण वनबीटचे वनरक्षक प्रफुल्ल फरतोडे यांनी शहरातून जंगलाकडे येणारे मार्ग सील केले आहे.
‘लॉकडाऊन’च्या काळात विनापरवानगीने प्रवेश केल्यास भारतीय वनअधिनियम कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. वन्यजीव वाचेल तर, जंगल वाचेल यानुसार वनकर्मचारी जंगलाच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावत आहे. दक्षिण वडाळी बीटचे प्रफुल्ल फरतोडे यांनी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शनिवारी जंगलात १० वडवृक्षाचे रोपण करीत सामाजिक कार्याचा परिचय दिला.