नितीन गडकरी यांनी सपत्नीक घेतले अंबादेवी, एकविरा देवीचे दर्शन
By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: June 23, 2024 15:10 IST2024-06-23T15:10:23+5:302024-06-23T15:10:38+5:30
मंदिराच्या विकास कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन ना. गडकरी यांनी यावेळी दिले.

नितीन गडकरी यांनी सपत्नीक घेतले अंबादेवी, एकविरा देवीचे दर्शन
अमरावती : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे रविवारी अमरावती जिल्हा दौऱ्यावर आले होते. दरम्यान त्यांनी सपत्नीक विदर्भाची कुलदेवता असलेल्या श्री अंबादेवी व श्री एकविरा देवीचे दर्शन घेतले. या संस्थाच्यावतीने ना. गडकरी, त्यांच्या पत्नी कांचन गडकरी यांचा शाल, श्रीफळ देऊन यावेळी सत्कार करण्यात आला.
मंदिराच्या विकास कामाबाबत सदस्य विलास मराठे यांनी प्रास्ताविकेतून माहिती दिली. मंदिराच्या विकास कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन ना. गडकरी यांनी यावेळी दिले.
यावेळी आमदार प्रवीण पोटे-पाटील तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. श्री अंबादेवी संस्थानाचे अध्यक्ष विद्या देशपांडे, सचिव रवींद्र कर्वे, विश्वस्त विलास मराठे, किशोर बेंद्रे, सुरेंद्र भुरंगे, अशोक खंडेलवाल, डॉ. यशवंत मशानकर, जयंत पांढरीकर आदी उपस्थित होते. र श्री एकविरा देवी संस्थानाचे अध्यक्ष डॉ. अनिल खरया, सचिव चंद्रशेखर कुळकर्णी, विश्वस्त राजेंद्र टेंबे यांनी गडकरी यांचा सपत्नीक सत्कार केला. श्री अंबादेवी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कार्य सुरू आहे. याबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली.