दीक्षांत समारंभात नितीन गडकरी ‘कन्फर्म’, राज्यपालांची मात्र प्रतीक्षाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:29 IST2021-02-05T05:29:00+5:302021-02-05T05:29:00+5:30
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३७ वा दीक्षांत समारंभ २१ फेब्रुवारी २०२१ रोजी होणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक ...

दीक्षांत समारंभात नितीन गडकरी ‘कन्फर्म’, राज्यपालांची मात्र प्रतीक्षाच
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३७ वा दीक्षांत समारंभ २१ फेब्रुवारी २०२१ रोजी होणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे विशेष अतिथी म्हणून ‘कन्फर्म’ झाले आहेत. मात्र, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून अद्यापही होकार मिळालेला नाही. येत्या दोन ते तीन दिवसांत राज्यपालांचे संमतीपत्र मिळेल, अशी माहिती आहे.
वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून २३ फेब्रुवारी रोजी दीक्षांत समारंभ घेण्याचे नियोजन विद्यापीठ प्रशासनाने चालविले होते. मात्र, या समारंभासाठी २३ फेब्रुवारी रोजी विशेष अतिथी, पाहुण्यांची तारीख मिळत नसल्याने २१ फेब्रुवारी रोजी हा समारंभ होऊ घातला आहे. त्याअनुषंगाने ना. नितीन गडकरी यांनी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्यास संमती दर्शविली आहे. कुलगुरू मुरलीधर चांदेकर, परीक्षा व मू्ल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांनी नुकतीच नागपूर येथे ना. गडकरी यांची भेट घेऊन दीक्षांत समारंभाचे विशेष अतिथी म्हणून निमंत्रण स्वीकारले आहे. आता केवळ राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून संमतीची प्रतीक्षा आहे. राज्य शासनाच्या गाईडलाईननुसार दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात येणार आहे. दीक्षांत समांरभ ऑनलाईन की, ऑफलाईन याबाबत तूर्तास निर्णय झालेला नाही. मात्र, २१ फेब्रुवारी रोजी हा सोहळा होईल, ही बाब कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी ‘लोकमत’शी बाेलताना स्पष्ट केली. या समारंभात संशोधकांना पीएच.डी., विद्या शाखानिहाय गुणवत्ता यादीत स्थान पटकाविणाऱ्यांना सुवर्ण, रौप्य, रोख पारितोषिके, पदवी, पदविका प्रदान करण्यात येणार आहे. त्यानुसार विद्यापीठ प्रशासनाने तयारी चालविली आहे.