न्याय मंदिर साकारणारे नितीन गभणे यांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 22:22 IST2018-03-10T22:22:32+5:302018-03-10T22:22:32+5:30
एकूण २५५ कॉलमवर जिल्हा व सत्र न्यायालयाची भव्यदिव्य, देखणी इमारत साकारणारे इंदू कन्स्ट्रक्शन कंपनीचे संचालक नितीन गभणे यांचा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

न्याय मंदिर साकारणारे नितीन गभणे यांचा गौरव
आॅनलाईन लोकमत
अमरावती : एकूण २५५ कॉलमवर जिल्हा व सत्र न्यायालयाची भव्यदिव्य, देखणी इमारत साकारणारे इंदू कन्स्ट्रक्शन कंपनीचे संचालक नितीन गभणे यांचा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. अमरावतीसाठी ही वास्तू ‘माइल स्टोन’ ठरेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
जिल्हा व सत्र न्यायालयाची वास्तू अशी देखणी आणि भव्यदिव्य असू शकते, हा अनुभव सर्वोच्च ते उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्र्तींनी साक्षात अनुभवला. सहा माळे, ३२ न्यायालये, अत्याधुनिक व्यवस्था आणि वास्तूच्या बाहेरील भागात ३५ एमएम जाडीचे धौलपुरी दगड डोळ्यांत भरतात. या भूकंपरोधी इमारतीचे आयुर्मान १५० वर्षे असेल. वैशिष्ट्यपूर्ण बांधकामासाठी नितीन गभणे यांचा शनिवारी उद्घाटन सोहळ्यात सत्कार होईल, असे पत्र जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल पानसरे यांनी दिले होते. त्यानुसार गभणे यांचा मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्ती विजया ताहिलरमाणी यांच्या अध्यक्षतेखाली गौरव करण्यात आला.
माझी पत्नी अलका गभणे वास्तुशिल्पकार असल्याने त्यांचे या कामी भरीव सहकार्य मिळाले. बांधकामदरम्यान काही अडचणी आल्यात; परंतु ही वास्तू विठ्ठलाच्या कृपेने मन:पूर्वक साकारली.
नितीन गभणे
संचालक, इंदू कन्स्ट्रक्शन कंपनी