-तर नववा दिवस आमचा!

By Admin | Updated: June 11, 2015 00:08 IST2015-06-11T00:08:22+5:302015-06-11T00:08:22+5:30

सहा महिन्यांपासून वारंवार निवेदने देऊन आणि मागण्या करूनही नवसारी येथील देशी दारू दुकान हटविण्याबाबत निर्णय..

-The ninth day is ours! | -तर नववा दिवस आमचा!

-तर नववा दिवस आमचा!

अमरावती : सहा महिन्यांपासून वारंवार निवेदने देऊन आणि मागण्या करूनही नवसारी येथील देशी दारू दुकान हटविण्याबाबत निर्णय घेतला जात नसल्याने नवसारीवासी त्रस्त झाले आहेत. आठ दिवसांंच्या आत नवसारीतील देशी दारू दुकान न हटविल्यास नवव्या दिवशी या देशी दारू दुकानावर हल्लाबोल करून रास्ता रोको आंदोलन करू, असा इशारा या परिसरातील नागरिकांनी आयोजित पत्रकार परिषदेतून दिला.
सामान्य नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असलेले व समाजस्वास्थ्यासाठी धोक्याचे असलेले नवसारी येथील देशी दारू दुकान हटविण्याची मागणी नागरिकांनी रेटून धरली आहे. सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तसेच सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी एकजूट होऊन हे दारू दुकान हटविण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांसह उत्पादन शुल्क विभागालाही वारंवार निवेदने दिली. यासाठी फेब्रुवारी महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनही करण्यात आले होते. परंतु प्रशासनाने याची कोणतीही दखल घेतली नाही. नवसारी येथील दारू दुकान हटविण्याचा मुद्दा प्रलंबित आहे. दारू दुकानामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. या दारू दुकानाच्या शेजारीच नवोदय विद्यालय, सैनिकी वसतिगृह, गायत्री नर्सिंग स्कूल, मनपा प्राथमिक शाळा, दत्तमंदिर, बौध्दविहार आहे. आठवडाभराच्या आत हेदुकान येथून हटवावे अन्यथा नवव्या दिवशी हल्लाबोल करण्यात येणार आहे.

Web Title: -The ninth day is ours!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.