चांदूररेल्वे तालुक्यात १० वर्षांत ९१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By Admin | Updated: December 29, 2014 03:00 IST2014-12-29T03:00:38+5:302014-12-29T03:00:38+5:30

चांदूररेल्वे तालुक्यातील ४४ गावांत गेल्या १० वर्षांत ९१ शेतकऱ्यांनी नापिकीला कंटाळून आत्महत्या केली असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.

Ninety farmers committed suicide in 10 years in Chandurrevela taluka | चांदूररेल्वे तालुक्यात १० वर्षांत ९१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

चांदूररेल्वे तालुक्यात १० वर्षांत ९१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

प्रभाकर भगोले चांदूररेल्वे
चांदूररेल्वे तालुक्यातील ४४ गावांत गेल्या १० वर्षांत ९१ शेतकऱ्यांनी नापिकीला कंटाळून आत्महत्या केली असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. ३४ शेतकरी लाभपात्र ठरले असून ५८ शेतकरी कुटुंब मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
जमीन कोरडवाहू त्यातही उत्पादित खर्चाच्या तुलनेत शेतमालाला योग्य भाव नाही. पुढील हंगाम साथ देईल या आशेवर कर्ज काढून शेती फुलविली; मात्र नापिकीलाच सामोरे जाण्याची वेळ दरवर्षी येत असल्याने कर्जाचा डोंगर वाढत गेला. सावकाराचे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत अखेरचा मार्ग म्हणून शेतकरी आत्महत्येला प्राधान्य देत असल्याचे तालुक्यात चित्र आहे. यामुळे नैराश्य जिवावर बेतून ९१ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. ९१ शेतकऱ्यांपैकी ३४ शेतकरी लाभपात्र ठरले. उर्वरित अपात्र कसे राहिले. दहा वर्षांपासून गंभीर बाबीकडे लक्ष पुरविण्यास संबंधित यंत्रणा अपयशी ठरते. तालुक्यात १८ टक्के ओलीत क्षेत्र ८२ टक्के कोरडवाहू क्षेत्र आहे. कोरडवाहू क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी शासनाने चाळीस वर्षांत उपाययोजना केली नाही. सिंचन प्रकल्प नाही, निधी नाही, ठरावीक शेतकऱ्यांना विहिरींचे अनुदान, राजकीय कार्यकर्त्यांना महागडे बियाणे याबाबत खोलवर विचार करणे गरजेचे आहे.
शेतकरी शेतात राब राब राबतात. सर्व शेतीला अनुदानअनुदान देणे गरजेचे आहे. यासाठी शासनाने अद्यापही दखल घेतली नाही. यामुळे शेतकरी अडचणीत येऊन आत्महत्याकडे वळतात. स्वातंत्र्य काळापासून शेती व्यवसायात प्रगल्भता आलेली नाही. ओलिताची संपूर्ण सोय, सर्वांना अनुदान, शेत तेथे विहीर, कुंपणाची सोय इत्यादी बाबींवर आर्थिक तरतूद करून पर्यायी दीर्घकालीन सोईसुविधा करणे गरजेचे झाले आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयासाठी अनुदान वाढविणे गरजेचे नसून जिवंत शेतकऱ्यांना मदत करणे अपेक्षित आहे. चालू वर्षातही २१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून आत्महत्याचे सत्र सरकारच्या नाकर्तेपणाने यात वाढ सातत्याने वाढत आहे.

Web Title: Ninety farmers committed suicide in 10 years in Chandurrevela taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.