पशुसंवर्धन विभागात मिळणार नऊ सेवांची हमी

By Admin | Updated: July 21, 2015 00:26 IST2015-07-21T00:26:42+5:302015-07-21T00:26:42+5:30

पशुंचे खच्चिकरण, वंध्यत्व व तपासणी यासह पशुसंवर्धन विभागात पशुधन पालक आणि शेतकऱ्यांना सेवा हमी...

Nine services will be ensured in the Animal Husbandry Department | पशुसंवर्धन विभागात मिळणार नऊ सेवांची हमी

पशुसंवर्धन विभागात मिळणार नऊ सेवांची हमी

शासन निर्णय : कुचराई केल्यास होणार कारवाई
अमरावती : पशुंचे खच्चिकरण, वंध्यत्व व तपासणी यासह पशुसंवर्धन विभागात पशुधन पालक आणि शेतकऱ्यांना सेवा हमी कायद्याअंतर्गत प्रमाणपत्र देणे यासारख्या या विभागाशी संबंधित ९ प्रकारच्या सेवा निश्चित वेळेत मिळाल्या नाहीत तर शेतकरी आणि पशुधन पालक त्या विरोधात दाद मागता येणार आहे. अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक विलंब करून सेवा पुरविण्यास दिरंगाई केल्याचे निष्पन्न झाल्यास त्या अधिकाऱ्यावर कारवाई होऊ शकते.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्यानुसार पशुसंवर्धन विभागाच्या ९ सेवा अधिसूचित करण्यात आल्या आहेत. तसेच या सेवा नेमक्या किती कालावधीत पुरवाव्यात, त्याची कालमर्यादा आणि निश्चित कालावधीत सेवा पुरवली नाही तर दाद मागता येईल, अशी वरिष्ठ अधिकाऱ्यांची यादी यापूर्वी सूचना काढून जाहीर करण्यात आली आहे. विधानसभेत नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा हक्क विधेयक मंजूर करण्यात आले.
राज्यातील युती सरकारने पहिल्याच बैठकीत नागरिकांना वेळेत सेवा मिळण्यासाठी कायदा करण्याचे जाहीर केले होते. त्या अनुषंगाने अध्यादेश जारी करण्यात आला होता. या कायद्यामुळे जनतेला निश्चित वेळेत सेवा मिळण्याचा अधिकार मिळाला आहे.
सरकारी अधिकारी वेळेत काम करण्यास बांधील आहेत. वेळेत सेवा न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची तरतूद या कायद्यात असल्याने अनियमितता भ्रष्टाचारासारखे प्रकार नक्कीच कमी होतील, असा आशावाद राज्याच्या भाजपा शिवसेना सरकारने व्यक्त केला आहे.
या कायद्यानुसार शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सेवांचा कालावधी ठरवून देण्यात आला आहे. पशुसंवर्धन आयुक्तांनी अधिसूचना काढून पशुसंवर्धन विभागाच्या ९ सेवा अधिसूचित केल्या आहेत. ठराविक मुदतीत सेवा न मिळाल्यास शेतकऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार करता येणार आहे. प्रत्येक सेवेसाठी प्रथम व द्वितीय अपीलीय अधिकारी ठरवून देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)

अशा आहेत सेवा शर्ती
पशुंचे खच्चिकरण, पशुसोबतच असल्यास त्याच दिवशी दवाखान्याचे वेळामध्ये ,वंध्यत्व व तपासणी पशुसोबतच असल्यास त्याच दिवशी दवाखान्याचे वेळामध्ये,शवविच्छेदन न कुजलेले मीत प्राणि सादर केल्यास त्याच दिवशी केवळ अहवाल तीन दिवसांचे आत, पशुंची नमुने तपासणी आजारी पशु दवाखान्याचे वेळेमध्ये आणल्यास नमुने गोळा करणे त्याच दिवशी, पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक गट (अ)तालुका लघु पशुसवर चिकित्सालय व जिल्हा पशुसर्वचिकित्सालय तीन दिवसाचे आत, आरोग्य तपासणी व दाखला देणे, पशु दवाखान्याचे वेळेमध्ये आणल्यास त्याच दिवशी आणि प्रमाणपत्र तीन दिवसात, गर्भ तपासणी गायी व म्हशींची त्याच दिवशी, गायी व म्हैशींना कूत्रीम रेतन करणे उपयुक्त काखंडात असल्यास त्याच दिवशी अशा प्रकारे विविध मुद्यावर सेवा हमी देणार आहे.

Web Title: Nine services will be ensured in the Animal Husbandry Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.