चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने महिलेसह नऊ गंभीर
By Admin | Updated: March 6, 2017 00:04 IST2017-03-06T00:04:04+5:302017-03-06T00:04:04+5:30
चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने एका महिलेसह नऊ मुलींना विषबाधा झाल्याचा प्रकार शनिवारी नजीकच्या सावळी दातुरा येथे घडला. रुग्णांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने महिलेसह नऊ गंभीर
प्रकृती धोक्याबाहेर : सावळी दातुरा येथील घटना
परतवाडा : चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने एका महिलेसह नऊ मुलींना विषबाधा झाल्याचा प्रकार शनिवारी नजीकच्या सावळी दातुरा येथे घडला. रुग्णांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
गीताबाई कमल बारस्कर (३५), निकिता बळीराम सारवे (१५), रितु कमल बारस्कर (८), ममता जगन धुर्वे (१६), योगिता बळीराम सारवे (१२), शिवाणी गुलाब कचाये (११), तुळशी अनिल कस्तुरे (७), वैष्णवी अनिल कस्तुरे (८), ज्योती विशाल परते (१६) अशी चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने विषबाधा झालेल्या महिलेसह मुलींची नावे आहेत. त्यांच्यावर अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आल्याने प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे.
सावळी दातुरा गावात एका महाराजने लावलेल्या झाडाला फळे लागल्याने या आदिवासी मुलींनी ते बिया खाऊन घरी गेल्या. मात्र थोड्याच वेळात त्यांना उलटी आणि गरगरल्यासारखे जाणवू लागले. गावकऱ्यांसह परिजनांनी त्यांना अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात भरती केले. वैद्यकीय अधिकारी वर्मा यांनी तत्काळ उपचार केले. गावात मात्र उलटसुलट चर्चेला पेव फुटले होते. (प्रतिनिधी)