३७ लाखांसाठी पाच कोटींची मालमत्ता महापालिकेच्या नावे!

By Admin | Updated: July 3, 2016 23:59 IST2016-07-03T23:59:56+5:302016-07-03T23:59:56+5:30

थकीत कर न भरता महापालिका यंत्रणेला वाकुल्या दाखविणाऱ्या २६ मालमत्तांवर कायदेशीर टाच येणार आहे.

Nine million rupees worth property worth Rs. 37 lakhs! | ३७ लाखांसाठी पाच कोटींची मालमत्ता महापालिकेच्या नावे!

३७ लाखांसाठी पाच कोटींची मालमत्ता महापालिकेच्या नावे!

आयुक्तांचा धाडसी निर्णय : व्यावसायिकांमध्ये खळबळ
अमरावती : थकीत कर न भरता महापालिका यंत्रणेला वाकुल्या दाखविणाऱ्या २६ मालमत्तांवर कायदेशीर टाच येणार आहे. ३७ लाख रूपयांच्या थकीत करापोटी सुमारे ४ ते ५ कोटी रूपयांच्या औद्योगिक मालमत्ता महापालिकेच्या नावे लावण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महापालिका आयुक्तांच्या या धाडसी निर्णयाने औद्योगिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.
आयुक्त हेमंत पवार यांच्या निर्देशानुसार झोन ४ चे सहायक आयुक्त योगेश पिठे व करमूल्यांकन अधिकारी महेश देशमुख यांनी या मालमत्ता महापालिकेच्या नावे लावण्याच्या प्रक्रियेला चालना दिली आहे. सुमारे सव्वा कोटी रूपयांच्या थकीत करापोटी तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी एमआयडीसी व सातुर्णा एमआयडीसीमधील ८९ मालमत्ता जप्त केल्या होत्या. त्यानंतरही उद्योजकांनी रक्कम भरण्यास टाळाटाळ केल्याने लिलाव जाहीर करण्यात आला. लिलावाच्या धसक्याने ८९ पैकी २६ मालमत्ताधारक वगळता इतरांनी १७ लाख रूपयांचा भरणा केला तर काहींनी मुदत मागून घेतली. प्रत्यक्ष लिलावाच्या दिवशी हे २६ मालमत्ताधारक पालिकेत फिरकले नाहीत.

Web Title: Nine million rupees worth property worth Rs. 37 lakhs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.