शहरं
Join us  
Trending Stories
1
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
2
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
3
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
4
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
5
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
6
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
7
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
8
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
9
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
10
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
11
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
12
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
13
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
14
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
15
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
16
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
17
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
18
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
19
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
20
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र

वृक्षलागवडीसाठी नऊ लाख रोपे, ग्लोबल वार्मिंगसाठी उपयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 22:42 IST

एक जुलैपासून राज्यभर ३३ कोटी वृक्षलागवड मोहीम राबविली जाणार आहे. त्यासाठी परतवाडा येथील वनविभाग व सामाजिक वनीकरण विभागातर्फे विविध ४८ प्रजातींची जवळपास नऊ लक्ष ७० हजार रोपे लागवडीसाठी तयार झाली आहेत. एका मोठ्या मोहिमेत या वृक्षांचा ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटाचा सामना करण्यासाठी महत्त्वपूर्ण सहभाग राहणार आहे.

ठळक मुद्दे३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेची उत्स्फूर्त तयारी : ४८ प्रजाती, १ जुलैपासून प्रारंभ, विविध प्रजातींच्या रोपांचे संगोपन

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : एक जुलैपासून राज्यभर ३३ कोटी वृक्षलागवड मोहीम राबविली जाणार आहे. त्यासाठी परतवाडा येथील वनविभाग व सामाजिक वनीकरण विभागातर्फे विविध ४८ प्रजातींची जवळपास नऊ लक्ष ७० हजार रोपे लागवडीसाठी तयार झाली आहेत. एका मोठ्या मोहिमेत या वृक्षांचा ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटाचा सामना करण्यासाठी महत्त्वपूर्ण सहभाग राहणार आहे.तीन वर्षांपासून राज्यभर वृक्षलागवड मोहीम राबविली जात आहे. ही वृक्ष लागवड सर्वसमावेशक असून, प्रत्येक घटक यात सहभागी होत आहे. वृक्षलागवडीसाठी वनविभाग सामाजिक वनीकरण याचप्रमाणे विविध यंत्रणांमार्फत रोपे तयार करण्याचे काम वर्षभरापूर्वीपासूनच राबविण्यात येत असल्याचे सवश्रुत आहे. विविध प्रजातींच्या झाडांचे बी आणून त्याला अंकुर फुटल्यावर रोपात रूपांतर करण्याचे काम रोपवाटिकांमध्ये केल्या जात आहे. तापत्या उन्हात सर्वत्र भीषण पाण्याची टंचाई सुरू असताना रोपवाटिकेतील मजूर अधिकारी या रोपांना वाचविण्याची कसरत करताना दिसत आहे. उन्हापासून रोप करपू नये, वर्षभर घेतलेले परिश्रम वाया जाऊ नये व वृक्ष लागवडीसाठी ही रोपे हिरवीगार आणि ताजी टवटवीत कशी राहतील, यासाठी रात्रंदिवस कटाक्ष पाळला जात आहे. दिवसेंदिवस वनस्पतींची कमतरता प्रकर्षाने जाणवत असून, पर्यावरणास धोका वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.आॅनलाईन खड्डे नोंदणीनुसार रोप वाटप३३ कोटी वृक्ष लागवडीत ज्या शासकीय कार्यालयांनी, संस्थांनी वृक्ष लागवडीसाठी तयार करण्यात आलेल्या खड्ड्यांची आॅनलाईन नोंदणी केली. खड्डे खोदण्याचे फोटोसुद्धा अपलोड करण्यात आले. त्यांना प्रथम रोपे देण्यात येणार असून त्यासोबतच वेळेवर आॅफलाइन येणाऱ्या काही सामाजिक संस्था,खाजगी नागरिक यांना सुद्धा रोपे देण्यात येईल. अमरावती येथे जिल्हा स्तरावरुन मॉनिटरिंग केले जाणार आहे.वनविभाग आणि वनीकरणाची ९ लाख रोपेपरतवाडा वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागाची वडगाव फत्तेपूर येथे रोपवाटिका असून येथे वर्षभरापासून वड ,पिंपळ, कडूनिंब, आवळा, सिताफळ ,टेटू, रक्तचंदन, बेहडा, हिरडा, बांबू, किमी, सागवान, आंबा, फणस, चिंच, गोंधन, कवस, निलगिरी, कडुबदाम, सरू अशा जवळपास ४८ प्रजातीच्या विविध झाडांची रोपे तयार करण्यात आली आहे. वडगाव फत्तेपूर येथील रोपवाटिकेत ६ लाख, पायविहिर रोपवाटिकेत ५० हजार तर सामाजिक वनीकरण विभागाच्या वडगाव फत्तेपुर येथील नर्सरीत २ लाख ६८ हजार अशी एकूण ९ लाख रोप तयार करण्यात आली असल्याची माहिती वनपरिक्षेत्राधिकारी शंकर बारखडे यांनी दिली.वनविभाग आणि सामाजिक वनीकरणच्या वडगाव फत्तेपूर, पायविहिर रोपवाटिकेत जवळपास नऊ लाख रोपे वृक्ष लागवडीसाठी तयार करण्यात आली आहेत. जिल्हास्तरावर झालेल्या नोंदणीनुसार ही रोपे वाटप केले जाणार आहेत.- शंकर बारखडे,वनपरिक्षेत्राधिकारी, परतवाडा