तळेगाव दशासर येथे नऊ लाखांचे बनावट बियाणे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 05:01 IST2020-06-09T05:00:00+5:302020-06-09T05:01:34+5:30
एका मालवाहू वाहनाने धामणगाव तालुक्यात बोगस बियाणे येत असल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली. त्यांनी नाकाबंदी केली असता देवगाव फाट्यावर एमएच २७ झेड ६५६९ या वाहनात नऊ कट्टे बोगस बियाणे आढळून आले. या कट्ट्यावर धामणगाव एम.एच. फौजी साहब, असे नमूद आहे.

तळेगाव दशासर येथे नऊ लाखांचे बनावट बियाणे जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : खरीप हंगामात विक्री होणारे तब्बल ९ लाखांचे बनावट कपाशी बियाणे तालुक्यातील देवगाव येथे जप्त करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पोलीस पथकाने सोमवारी दुपारी ४ वाजता पेट्रोलींग दरम्यान ही कारवाई केली.
एका मालवाहू वाहनाने धामणगाव तालुक्यात बोगस बियाणे येत असल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली. त्यांनी नाकाबंदी केली असता देवगाव फाट्यावर एमएच २७ झेड ६५६९ या वाहनात नऊ कट्टे बोगस बियाणे आढळून आले. या कट्ट्यावर धामणगाव एम.एच. फौजी साहब, असे नमूद आहे. सदर ९ कट्टे तपासले असता त्यात बीजीएम ४ एक्सजीआयएन नावाने तीनशे पाकीट, सिकंदर हैदराबाद कॉटन सीड्स नावाने एकूण २०० पाकिटे, कोहिनूर कॉटन हायब्रीड सीड्स न्यू टेक्नॉलॉजीचे १०० पाकिटे, धनलक्ष्मीचे १०३ पाकिटे, हर्षा ५५५ बीजी टू नावाने ९६ पाकिटे तसेच कॉटन एसएस कॉटन सीड्स या नावाची ९९ पाकिटे, असे एकूण ८९८ पाकिटे मिळाले. विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अनंत मस्करे यांनी पाहणी केली असता, सदर पाकिटांवर उत्पादक तसेच विपणन करता यांच्या नावाचा उल्लेख नव्हता. गुणवत्ता नियंत्रक कृषी अधिकारी यांच्याकडून तपासणी केली असता, ते सर्व बियाणे बोगस असल्याचे स्पष्ट झाले. सपोनि अजय आकरे यांच्या नेतृत्वात अजमत सैय्यद, स्वप्निल तंवर, पंकज फाटे, विजय अवचार यांनी केली. धामणगाव तालुका कृषी अधिकारी अजय तळेगावकर यांनी तक्रार नोंदवली. चालक रामबीर रामचरण सिंग (ह.मु.बोरगाव धांदे) याला अटक केली आहे.