नऊ सिंचन प्रकल्पांची जूनअखेर घळभरणी

By Admin | Updated: December 15, 2015 00:28 IST2015-12-15T00:28:15+5:302015-12-15T00:28:15+5:30

नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती जिल्ह्यातील समस्यांचा विस्तृत आढावा घेतला.

Nine irrigation projects to be completed by June | नऊ सिंचन प्रकल्पांची जूनअखेर घळभरणी

नऊ सिंचन प्रकल्पांची जूनअखेर घळभरणी

पत्रपरिषद : जिल्हाधिकारी किरण गित्ते यांची माहिती
अमरावती : नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती जिल्ह्यातील समस्यांचा विस्तृत आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प, जलयुक्त शिवार योजना, कृषी योजना, जलसंपदा, वीज वितरण कंपनी अन्य विविध योजनांची माहिती घेतली. याप्रसंगी अमरावती जिल्ह्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्याची कामे जूनअखेरपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. यासाठी पुरेसा निधीसुध्दा शासनामार्फ त उपलब्ध होणार असल्याची माहिती सोमवारी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी पत्रपरिषदेत दिली. पुढे बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यात ९० सिंचन प्रकल्पाचे कामे मंजूर आहेत.
जिल्ह्यात अनुशेषांतर्गत ३२ सिंचन प्रकल्प आहेत. त्यापैकी ८ प्रकल्पांची घळभरणी झाली आहे. उर्वरित प्रकल्पांचे काम येत्या तीन वर्षांत टप्प्या टप्प्याने पूर्ण करण्यात येईल, असे सांगून अनुशेषांतर्गत यासाठी कालबध्द कार्यक्रम हाती घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विद्युत पंप बसविण्यासाठी १०,६९२ एवढा लक्षांक होता. त्यापैकी ३,४७३ जोडण्या पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित मार्च,२०१६ पर्यंत होईल. सोलरसाठी १७०० सोलरपंप मंजूर असून २०३ अर्ज प्राप्त झाले आहेत. महसूल विभागातील रिक्त जागा जवळपास पूर्ण भरण्यात आली आहेत. जलसंपदा विभागातील १२00 अभियंत्यांची पदे भरण्याची परवानगी देण्यात आल्याचे सांगत जिल्ह्यातील २९४ पदांपैकी ९४ पदे रिक्त असल्याचाही उल्लेख त्यांनी केला. मेळघाटातील प्रश्न सोडविण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची १५ पदे भरली आहेत.
मध्य प्रदेशातील नेपानगरपासून धारणीपर्यंत ५५ कि.मी. ट्रान्समिशन लाईनचे काम मार्च, २०१५पासून सुरू असून १६ कोटी ५७ लक्ष रुपये व उपकेंद्राकरिता ८ कोटी ९२ लक्ष रुपये असा एकूण २५कोटी ४९ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.

Web Title: Nine irrigation projects to be completed by June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.