महापालिकेतील नऊ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

By Admin | Updated: July 12, 2014 23:25 IST2014-07-12T23:25:03+5:302014-07-12T23:25:03+5:30

महापालिकेत नऊ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. एकाच जागी अनेक वर्षांपासून कार्यरत कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार शुक्रवारी बदली

Nine employees shift in municipality | महापालिकेतील नऊ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

महापालिकेतील नऊ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

आयुक्तांचे आदेश : कार्यमुक्त करण्याच्या सूचना
अमरावती : महापालिकेत नऊ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. एकाच जागी अनेक वर्षांपासून कार्यरत कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार शुक्रवारी बदली आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. बदलीच्या जागी रुजू करणे व कार्यमुक्त करणे या बाबी विभागप्रमुखांनी कराव्यात, असे निर्देश देण्यात आले आहेत.
बदली करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये लेखा विभागात कार्यरत कनिष्ठ लिपिक गणेश मेश्राम यांची प्रभाग क्र.३, हमालपुरा तर प्रभाग क्र. २ येथील कनिष्ठ लिपिक अजय चव्हाण यांची लेखा विभागात, प्रभाग क्र.३ येथील एस.व्ही. गंगात्रे यांची सामान्य प्रशासन विभागातील उपायुक्तांच्या कार्यालयात तर वरिष्ठ लिपिकपदी कार्यरत जितेंद्र भिसडे यांची उपायुक्त (प्रशासन) यांच्या कार्यालयात स्थानांतरण झाले. कनिष्ठ लिपिक प्रदीप चौरमळे यांची उपायुक्त (सामान्य प्रशासन) कार्यालयात बदली करण्यात आली आहे.
बदली रद्द केली जाणार नाही
सामान्य प्रशासन विभागात कनिष्ठ लिपिकपदी कार्यरत कल्याणी गोरे यांची सहायक संचालक नगररचना विभागात तर सहायक संचालक नगररचना विभागातील कनिष्ठ लिपिक मोती मुन्ना कासदेकर यांची सामान्य प्रशासनात बदली करण्यात आली आहे.
नगर सचिव कार्यालयात शिपाईपदी कार्यरत राजेश वाघाडे यांची बाजार व परवाना विभागात बाजार व परवाना शिपाईपदी कार्यरत शेख इस्माईल यांची नगर सचिव कार्यालयात बदली करण्यात आली आहे. अचानक कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याने तर्कविर्तक लावले जात आहे. महापालिकेत कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या की, त्या रद्द करणे किंवा मर्जीच्या ठिकाणी बदली करुन घेणे या प्रकाराला खतपाणी घातले जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश आयुक्तांचे आहेत. त्यामुळे बदली झालेल्या जागेवर त्वरित रुजू होणे हाच एकमात्र उपाय असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Nine employees shift in municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.