तिवसा, भातकुली तालुक्यांतील रस्त्यांच्या विकासासाठी साडेनऊ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:13 IST2021-03-17T04:13:43+5:302021-03-17T04:13:43+5:30

पालकमंत्री : प्रत्येक काम गुणवत्तापूर्ण, दर्जेदार करण्याचे निर्देश भातकुली/तिवसा : रस्ते, पूल, इमारती आदी पायाभूत सुविधांसाठी निधी कमी पडू ...

Nine and a half crore for road development in Tivasa, Bhatkuli taluka | तिवसा, भातकुली तालुक्यांतील रस्त्यांच्या विकासासाठी साडेनऊ कोटी

तिवसा, भातकुली तालुक्यांतील रस्त्यांच्या विकासासाठी साडेनऊ कोटी

पालकमंत्री : प्रत्येक काम गुणवत्तापूर्ण, दर्जेदार करण्याचे निर्देश

भातकुली/तिवसा : रस्ते, पूल, इमारती आदी पायाभूत सुविधांसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही देतानाच, प्रत्येक काम गुणवत्तापूर्ण व दर्जेदार व्हावे, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी यंत्रणेला दिले.

वरखेड, मार्डा, जहागीरपूर, अंजनसिंगी, यावली, डवरगाव, मोझरी या रस्त्यांच्या सुधारणेसोबतच डवरगाव, मोझरी, वऱ्हा रस्त्याची सुधारणा या एकूण ९.५० कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन पालकमंत्री ठाकूर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समिती सभापती पूजा आमले, तिवसा पंचायत समिती सभापती शिल्पा हाडे, उपसभापती शरद वानखेडे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता विभावरी वैद्य यांच्यासह नागरिक याप्रसंगी उपस्थित होते. तिवसा, भातकुली, अमरावती तालुक्यांतील वरखेड, मार्डा, जहागीरपूर, मालधूर, गुरुकुंज मोझरी, नांदगावपेठ, खोलापूर, टाकरखेडा संभू परिसरातील विविध गावे, खेड्यापाड्यांतील नागरिकांना या विकासकामांचा लाभ होणार आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्य व विचारांची ओळख संपूर्ण देशाला आहे. महाराजांची कर्मभूमी गुरुकुंज मोझरी ही अमरावती-नागपूर महामार्गावर आहे. आदर्श ग्राम म्हणून ओळखले जाणारे मोझरी व परिसर नागरी सुविधांनी परिपूर्ण करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे निर्देशही त्यांनी दिले. मोझरी बसस्थानकापासून मोझरी गावापर्यंत रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरण होणार असल्याची माहिती अभियंत्या वैद्य यांनी दिली.

Web Title: Nine and a half crore for road development in Tivasa, Bhatkuli taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.