नीलगाईच्या पिलाला मिळाले जीवदान
By Admin | Updated: September 23, 2015 00:31 IST2015-09-23T00:31:57+5:302015-09-23T00:31:57+5:30
श्वानाच्या तावडीतून सुटलेल्या नीलगाईच्या पिल्लाला सावंगा आसरा येथील राजू पेठे यांनी जीवदान दिले.

नीलगाईच्या पिलाला मिळाले जीवदान
अमरावती : श्वानाच्या तावडीतून सुटलेल्या नीलगाईच्या पिल्लाला सावंगा आसरा येथील राजू पेठे यांनी जीवदान दिले.
शिरजगावजवळील सावंगा आसरा येथील शेतशिवारात श्वानांच्या तावडीत नीलगाय व तिचे पिल्लू सापडले होते. ही बाब राजू पेठे यांच्या लक्षात येताच त्यांनी श्वानांना हाकलून लावले. यावेळी नीलगायसुध्दा पळून गेली. मात्र, नीलगाईचे पिल्लू तेथेच बसून होते. राजू पेठे यांनी नीलगायीच्या पिल्लाला घरी नेऊन वनविभागाला सुचना दिल्या. काही वेळात शिकारी प्रतिबंधक पथकाचे पी.टी.वानखडे, अमोल गावनेर, सतीश उमक, मनोज ठाकूर, वीरेंद्र उज्जैनकर, चंदू ढवळे, फिरोज खान व वाहन चालक रामेश्वर तनपुरे यांनी सावंगा आसरा गाठून नीलगाईच्या पिल्लाला ताब्यात घेतले. नीलगाईच्या पिल्लाला वडाळीच्या वनविभाग कार्यालय परिसरात ठेवण्यात आले आहे.