वडाळीत बिबट्याने नीलगाय, हरणाची केली शिकार
By Admin | Updated: December 31, 2014 23:16 IST2014-12-31T23:16:37+5:302014-12-31T23:16:37+5:30
येथील वडाळी रोपवन परिसरात बिबट्याने नीलगाय, हरणाची शिकार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मृतावस्थेत नीलगाय, हरणाचा वनविभागाने पंचनामा करुन जमिनीत पुरविले आहेत.

वडाळीत बिबट्याने नीलगाय, हरणाची केली शिकार
अमरावती : येथील वडाळी रोपवन परिसरात बिबट्याने नीलगाय, हरणाची शिकार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मृतावस्थेत नीलगाय, हरणाचा वनविभागाने पंचनामा करुन जमिनीत पुरविले आहेत. त्यामुळे बिबट्या शहराच्या सीमेवर वास्तव्यास असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मागील काही दिवसांपासून बिबट्या असल्याची बाब नागरिकांच्या प्रत्यक्षदर्शनीतून पुढे आली आहे. वन विभागाने भटकंती करीत असलेल्या या बिबट्याचा कसून शोध घेतला. मात्र, शहराच्या सीमेलगत असलेल्या या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश मिळाले नाही. मात्र दोन दिवसांपूर्वी वडाळी रोपवन परिसरात असलेल्या नीलगाय आणि हरणाच्या कळपातील बिबट्याने शिकार केल्यामुळे हा बिबट वडाळीच्या परिसरातच असल्याचे सिद्ध झाले आहे.
वडाळी रोपवन परिसराच्या मागील बाजूस तळे असून या बिबट्याला शिकारीसह पाण्याचा मुबलक साठा असल्यामुळे हा बिबट काही दिवसांपासून याच परिसरात वास्तव्यास आहे.
काही दिवसांपूर्वी छत्रीतलाव मार्गावर गावठी डुकरांची शिकार करुन टाकाऊ पदार्थ जंगलात आढळले होते. त्यामुळे वडाळीच्या परिसरात बिबट असल्यामुळे हा बिबट शिकारीच्या शोधात लोकवस्तीकडे येऊ शकतो, यात शंका नाही.