बातमी/ सारांश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:27 IST2021-02-05T05:27:49+5:302021-02-05T05:27:49+5:30

अमरावती : स्थानिक गोपालनगरात टी पाॅइंटवर रस्ते डांबरीकरणाची कामे सुरू आहे. त्यामुळे बडनेरा मार्गावर एक बाजूने वाहतूक वळविली जात ...

News / Summary | बातमी/ सारांश

बातमी/ सारांश

अमरावती : स्थानिक गोपालनगरात टी पाॅइंटवर रस्ते डांबरीकरणाची कामे सुरू आहे. त्यामुळे बडनेरा मार्गावर एक बाजूने वाहतूक वळविली जात आहे. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागत असून, बरचेदा वाहतूककोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे, वाहन चालकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

------------------------

परकोटालगत कचरा समस्या

अमरावती : स्थानिक ईतवारा बाजार ते जवाहर गेटदरम्यान ऐतिहासिक परकोटालगत कचरा समस्या ही नित्याचीच बाब झाली आहे. परिसरातील दुकानदार, व्यापारी व हातगाडी व्यावसायिक परकोटालगत कचरा आणून टाकत असल्याचे चित्र आहे. परकोटाचे सौंदर्यीकरण करण्यात आले असताना, कचऱ्यामुळे विद्रुपीकरण होत आहे.

--------------

विद्यापीठ उड्डाणपुलाखाली अतिक्रमण

अमरावती : येथील विद्यापीठ उड्डाणपुलाखाली हातगाडी, छोटे व्यावसायिकांनी अतिक्रमण चालविले आहे. एकाच बाजूने वाहतूक होत असून, येथून जडवाहतूक नियमित सुरू राहते. रस्त्यालगतच्या दुकानदारांमुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. रस्त्यालगतचे व्यावसायिकांना बाजूला करावे, अशी मागणी आहे.

-----------------

साईनगरात अंतर्गत रस्त्याची दैना

अमरावती : स्थानिक साईनगरात अंतर्गत रस्त्याची दैना झाली आहे. महापौर चेतन गावंडे, भाजपचे नेते तुषार भारतीय यांचा साईनगर हा प्रभाग असताना साईनगरात भागातील रस्ते नादुरुस्त असल्याचे चित्र आहे. अकोली मार्गावर जागोजागी खड्डे पडले आहे. नागरिकांसह वाहनचालक त्रस्त झाले आहे.

--------------------

शिकवणी वर्ग, ग्रंथालय सुरू करा

अमरावती : महाविद्यालय, विद्यापीठाचे शिकवणी वर्ग, ग्रंथालय सुरू करा, अशी मागणी एआयएसएफच्या वतीने करण्यात आली आहे. कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांना मागणीचे निवेदन जिल्हा सचिव योगेश चव्हाण यांनी सादर केले आहे. यूजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वाचे पालन करावे, अशी निवेदनातून नमूद आहे.

Web Title: News / Summary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.