बातमी/सारांश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:18 IST2021-02-26T04:18:06+5:302021-02-26T04:18:06+5:30

अमरावती : बडनेरा मार्गावर भुयारी गटाराचे चेंबर रस्त्यावर आल्याने ते अपघातासाठी कारणीभूत ठरत आहे. रात्रीच्या वेळेस हे चेंबर वाहन ...

News / Summary | बातमी/सारांश

बातमी/सारांश

अमरावती : बडनेरा मार्गावर भुयारी गटाराचे चेंबर रस्त्यावर आल्याने ते अपघातासाठी कारणीभूत ठरत आहे. रात्रीच्या वेळेस हे चेंबर वाहन चालकांना दिसून येत नाही. त्यामुळे या चेंबरवरून वाहने उसळून पडण्याची भीती निर्माण झाली आहे. चेंबर व्यवस्थित करावे, अशी मागणी आहे.

-----------------------

बडनेरा गांधी विद्यालयानजीक मार्गाची चाळण

अमरावती : बडनेरा गांधी विद्यालयानजीकच्या मार्गाची चाळण झाली आहे. जागोजागी खड्डे पडले असून, वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. लोकप्रतिनिधींचे या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे. हल्ली शाळा, महाविद्यालये बंद असल्यामुळे गर्दी कमी आहे. मात्र, या मार्गावर नियमित वाहतूक सुरू असते.

----------------------------

विद्यापीठ मार्गावर अतिक्रमण वाढले

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ मार्गावर ठिकठिकाणी अतिक्रमण वाढीस लागले आहे. रस्तागलत हातगाड्या, पानठेले, भाजी विक्रेत्यांनी ठिय्या मांडला आहे. काही घरांनीदेखील रस्त्यालगत अतिक्रमण केल्याचे चित्र आहे. महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

-----------------------

आठवडीबाजारात अतिक्रमणाकडे दुर्लक्ष

अमरावती : बडनेरा नवीवस्ती येथील आठवडी बाजारात जागोजागी अतिक्रमण झाले असताना या गंभीर बाबीकडे लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे अतिक्रमणधारकांचे फावत असून, दरदिवशी येथील अतिक्रमणांत वाढ होत आहे. हीच स्थिती कायम राहिल्यास बाजारात जागा राहणार नाही, हे वास्तव आहे.

----------------------

गाडगेनगरात रस्त्यावर कचरा साठवण

अमरावती : स्थानिक गाडगेनगरात शासकीय तंत्रनिकेतनसमोर महापालिका सफाई कर्मचारी कचरा साठवून ठेवत असल्याने घाण होत आहे. लोकप्रतिनिधींनी या बाबीकडे दुर्लक्ष चालविले आहे. रस्त्यावर कचरा साठवून ठेवल्याने हा कचरा इतरत्र पसरत असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची चिन्हे आहेत.

Web Title: News / Summary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.