बातमी/ सारांश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:35 IST2021-02-20T04:35:19+5:302021-02-20T04:35:19+5:30

अमरावती : स्थानिक वडाळी येथील बांबू गार्डनकडे जाणारा मार्ग पूर्णत: नादुरुस्त झाला आहे. या मार्गाच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे लक्ष नाही. ...

News / Summary | बातमी/ सारांश

बातमी/ सारांश

अमरावती : स्थानिक वडाळी येथील बांबू गार्डनकडे जाणारा मार्ग पूर्णत: नादुरुस्त झाला आहे. या मार्गाच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे लक्ष नाही. लोकप्रतिनिधींच्या नोंदी हा मार्ग दुर्लक्षित आहे. वाहतुकीमुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे.

--------------------------

बडनेराच्या जुनी वस्तीत रस्ते निर्मिती

बडनेरा : जुनी वस्तीतील सावता मैदान ते टी पॉईंट या दरम्यान सिमेंट रस्त्याच्या चौपदीकरणाची कामे वेगाने सुरू आहे. त्यामुळे अमरावती- बडनेरा मार्गावरील वाहतूक विकस्ळीत झाली आहे. ट्राफिक जाम ही नित्याची बाब झाली आहे.

----------------------

कारागृह भिंतीलगत संरक्षण कुंपण नाही

अमरावती : येथील मध्यवर्ती कारागृहाच्या भिंतीलगत चांदूर रे्ल्वे मार्गाच्या बाजूने संरक्षण कुंपणाचा अभाव आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक खुल्या जागेवर कचरा, घाण आणून टाकतात. संरक्षण कुंपणाअभावी सागवान वृक्ष व अन्य झाडांची चोरीदेखील होत आहे.

---------------------------------

ऑक्सिजन पार्कसमोर मिनी कचरा डेपो

अमरावती: येथील जुने बायपास लगतच्या ऑक्सिजन पार्कसमोरील भागात मिनी कचरा डेपो तयार करण्यात आला आहे. महापालिका सफाई कर्मचारी परिसरातून गोळा झालेला कचरा याच भागात आणून टाकतात. त्यामुळे ऑक्सिजन पार्कसमोर कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

-------------------------------

विश्रामगृह ते नवीन बायपासलगत रस्ता नादुरुस्त

अमरावती : बडनेराच्या नवी वस्तीतील विश्रामगृह ते नवीन बायपास वळण रस्ता वर्षभरातच उखडला आहे. या रस्त्याच्या निर्मितीसाठी डांबर वापरले की नाही, असा सवाल आता उपस्थित होत आहे. रस्त्यावरील खड्डे बुजवावे, अशी मागणी आहे.

Web Title: News / Summary