बातमी/ सारांश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:20 IST2021-02-06T04:20:40+5:302021-02-06T04:20:40+5:30

अमरावती : चांदूर रेल्वे येथील अशोक महाविद्यालयाचे निलंबित प्राचार्य जयंत कारमोरे यांच्या भ्रष्टाचार, भोंगळ कारभाराविरूद्ध येथील सहससंचालक कार्यालयासमोर कृष्णकुमार ...

News / Summary | बातमी/ सारांश

बातमी/ सारांश

अमरावती : चांदूर रेल्वे येथील अशोक महाविद्यालयाचे निलंबित प्राचार्य जयंत कारमोरे यांच्या भ्रष्टाचार, भोंगळ कारभाराविरूद्ध येथील सहससंचालक कार्यालयासमोर कृष्णकुमार पाटील, प्रभारी प्राचार्य तपोवीन पाटील यांनी २५ जानेवारीपासून बेमुदत उपाेषण सुरू केले आहे.

------------------

राजापेठ उड्डाणपुलावर वाहतूककोंडी

अमरावती : येथील राजापेठ उड्डाण पुलावर वाहतूककाेंडीमुळे वाहन चालक त्रस्त झाले आहेत. राजापेठ पुलाखाली विकासकामे सुरू असून, रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. त्यामुळे उड्डाणपुलावरून वाहतूक होत आहे. एकाचवेळी वाहनांची गर्दी होत असल्याने बराच वेळ वाहतूक विस्कळीत होत आहे.

----------------------

बडनेरा रेल्वे स्थानक परिसरात ऑटोंची गर्दी वाढली

अमरावती: बडनेरा रेल्वे स्थानकावर रेल्वे गाड्यांची संख्या वाढत असल्याने ऑटोरिक्षांची संख्या वाढत आहे. गत दोन महिन्यांपासून प्रवाशांचीदेखील वाढ होत आहे. मुख्य प्रवेशद्धारासमोर ऑटो चालकांचीच रेलचेल दिसून येत आहे.

------------------

चित्रा चौकात रस्ते दुरूस्ती केव्हा?

अमरावती : येथील चित्रा चौकात काही ठिकाणी रस्त्याची कामे अर्धवट आहेत. त्यामुळे ही कामे त्वरित करावीत, अशी मागणी परिसरातील दुकानकारांनी केली आहे. चित्रा चौक ते प्रभात चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर रस्ते दुरूस्तीची कामे रखडली आहेत. छोट्याशा अर्धवट कामांमुळे वाहन चालक त्रस्त होत आहेत.

-----------------------

गाडगेनगरात फूटपाथ गायब

अमरावती : स्थानिक पंचवटी ते कठोरा नाका यादरम्यान गाडगेनगर भागात रस्त्यालगतचे फूटपाथ गायब झाले आहे. फूटपाथवर छोट्या व्यावसायिकांनी दुकाने थाटल्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून ये-जा करावी लागत आहे. परिणामी अपघाताची शक्यता बळावली आहे.

Web Title: News / Summary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.